हिंदू पंचांगानुसार, यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी विशेष पूजेचे आयोजन केले जाते.
महाशिवरात्रीची तिथी आणि महत्व
फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी ही महाशिवरात्रीच्या पूजेसाठी महत्त्वाची मानली जाते. यावर्षी ही तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 वाजता सुरू होऊन 27 फेब्रुवारीला सकाळी 08:54 वाजता समाप्त होईल. त्यामुळे महाशिवरात्रीचा सण 26 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल.
यंदा देखील शिव मंदिरांमध्ये पार्वती-शंकर विवाहाचा उत्सव, भजन-कीर्तन आणि रुद्राभिषेक यासारखी धार्मिक कार्ये पार पडतील. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक भक्त उपवास करतात आणि रात्रभर जागरण करतात.
महाशिवरात्रीच्या पूजेसाठी आवश्यक साहित्य
1. शिवपूजा साहित्य
• भगवान शंकर, माता पार्वती आणि शिवलिंगाची मूर्ती किंवा फोटो
• बेलपत्र, धतूरा, आक आणि पांढऱ्या फुलांचा हार
• गंगाजल, गोमूत्र, पवित्र जल
• भस्म (विभूती), चंदन, केशर, अक्षत (तांदूळ)
• जनेऊ, मौली (रक्षासूत्र), कुश आसन
2. अभिषेकासाठी साहित्य
• गोदुग्ध (गाईचे दूध), दही, मध, तूप, साखर (पंचामृत)
• फळे (बेर, नारळ, सफरचंद, केळी इ.)
• पान, सुपारी, छोटी इलायची
• धूप, दीप, कापूर
3. प्रसाद आणि भोग
• हलवा, ठंडाई, लस्सी, मिठाई
• पंचामृत आणि फळांचे भोग
4. शिवपूजन ग्रंथ आणि धार्मिक साहित्य
• शिव चालीसा, शिव आरती आणि महाशिवरात्री व्रतकथा पुस्तक
• हवन सामग्री (समिधा, तिळ, लोबान, तुप)
• दानसाठी अन्नधान्य, गूळ, वस्त्र, फळे
महाशिवरात्रीला पूजेसोबत उपवासाचेही विशेष महत्व
महाशिवरात्रीला उपवास ठेवल्यास आरोग्य उत्तम राहते, मनःशांती लाभते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते. अनेक भक्त फक्त पाणी, दूध आणि फळाहार घेत उपवास करतात.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.