ICC Champions Trophy 2025 : रोहित शर्मा बाहेर, शमीला विश्रांती; भारतीय संघात कोणाला संधी?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ICC Champions Trophy 2025 च्या साखळी फेरीतील शेवटचा सामना रविवारी रंगणार आहे. दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केलं आहे. यामुळं हा सामना प्रामुख्याने रणनीतीचा आणि खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून ते सेमीफायनलसाठी तंदुरुस्त राहतील.
रोहित शर्मा खेळणार की विश्रांती घेणार?
भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे. एका संकेत स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहितच्या मांसपेशींना ताण आल्यामुळे तो सराव सत्रात सहभागी होऊ शकला नाही. संघ व्यवस्थापन त्याला न्यूझीलंडविरुद्ध विश्रांती देण्याचा विचार करत आहे, जेणेकरून तो सेमीफायनलपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होईल. जर रोहितला विश्रांती दिली गेली, तर शुभमन गिल कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकतो.
हेही वाचा - IPL 2025 मध्ये इतिहास रचणार रोहित शर्मा; 450 T20 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू होणार!
ऋषभ पंतला मिळणार संधी?
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. केएल राहुलने याआधी यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे. तरीही पंतला फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून संधी देऊन त्याचा फॉर्मची चाचपणी केली जाऊ शकतो.
हेही वाचा - विराट कोहलीची फूड डायरी- 'हे' आहेत आवडते रेस्टॉरंट्स!
गोलंदाजी विभागात बदल होण्याची शक्यता
गोलंदाजीतही काही बदल होण्याची शक्यता आहे. फिरकीपटू कुलदीप यादवला विश्रांती देऊन त्याच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी दिली जाऊ शकते. तसेच अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही विश्रांती मिळू शकते आणि त्याच्या जागी अर्शदीप सिंग अंतिम संघात असण्याची शक्यता आहे. याशिवाय हर्षित राणालाही संधी मिळू शकते.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग 11
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती