मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा IPL 2025 मध्ये मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. हा IPL दिग्गज आगामी हंगामात ऐतिहासिक कामगिरी करणार असून 450 T20 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसणार आहे. 2024 T20 वर्ल्ड कपनंतर त्याने T20 क्रिकेटला अलविदा केले होते. मात्र, IPL मध्ये तो पुन्हा आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सने त्याला आगामी हंगामासाठी कायम ठेवले असून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली तो खेळणार आहे.
हेही वाचा : AUS vs SA: पावसाने घोळ घातला! ऑस्ट्रेलिया-आफ्रिका सामना रद्द झाल्यास Semi Final मध्ये कोण जाणार?
IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या सामन्यात रोहित 450 T20 सामने खेळण्याचा विक्रम गाठणार आहे. हा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. सध्या त्याने 448 T20 सामने खेळले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर दिनेश कार्तिक आहे, ज्याने 412 सामने खेळले असून तो आता भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
रोहितने 2007 मध्ये T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि भारताच्या पहिल्या T20 वर्ल्ड कप विजयात मोलाचा वाटा उचलला. IPL 2008 ते 2010 दरम्यान तो डेक्कन चार्जर्सचा भाग होता. 2011 च्या मेगा-लिलावात तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि तेव्हापासून तो संघाचा अविभाज्य भाग बनला आहे.
हेही वाचा : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
2013 मध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व स्वीकारले आणि त्याच हंगामात MI ने आपले पहिले IPL विजेतेपद पटकावले. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2015, 2017, 2019 आणि 2020 अशी एकूण 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकली. मात्र, 2024 मध्ये हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले, आणि त्याच्या नेतृत्वाखाली MI ने पहिल्यांदाच गुणतालिकेत तळाच्या स्थानावर हंगाम समाप्त केला.