Don't search for these 4 things on Google
Edited Image
आजच्या डिजिटल युगात, इंटरनेट आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. लोक त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गुगलचा वापर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या प्रत्येक ऑनलाइन क्रियांवर लक्ष ठेवले जाते? हो, तुमचा ब्राउझिंग इतिहास इंटरनेट सेवा प्रदाते (ISP), शोध इंजिन आणि सायबर सुरक्षा एजन्सी ट्रॅक करू शकतात. जर तुम्ही गुगलवर काहीतरी चुकीचे किंवा बेकायदेशीर सर्च केले तर ते तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे तुम्हालाला तुरुंगातही जावे लागू शकते. म्हणून सावधगिरी बाळगा आणि खालील चार धोकादायक गोष्टी कधीही गुगलवर सर्च करू नका.
बॉम्ब कसा बनवायचा -
जर तुम्ही गंमतीने गुगलवर 'बॉम्ब कसा बनवायचा' किंवा 'स्फोटके बनवण्याची पद्धत' असे सर्च केले तर ते तुम्हाला थेट अडचणीत आणू शकते. सुरक्षा संस्था अशा हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवतात आणि जर त्यांना कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली तर ते त्वरित कारवाई करू शकतात. अशा परिस्थितीत, पोलिस तुम्हाला चौकशीसाठी बोलावू शकतात. तसेच तुमच्या हालचाली संशयास्पद आढळल्यास, तुम्हाला अटक देखील केली जाऊ शकते.
बाल अश्लील सामग्री -
जगभरात बाल अश्लील सामग्री बेकायदेशीर मानली जाते आणि भारतातही कठोर कायदे आहेत. जर एखाद्या व्यक्तीने गुगलवर बाल पोर्नोग्राफीशी संबंधित कोणताही मजकूर शोधला तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. पोक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) कायद्यांतर्गत, अशा प्रकरणांमध्ये दीर्घ शिक्षा आणि मोठा दंड होऊ शकतो. सरकार आणि सायबर एजन्सी देखील अशा वेबसाइट्सचा मागोवा घेतात आणि ब्लॉक करतात. म्हणून, अशा शोधांपासून नेहमीच दूर रहा.
हेही वाचा - भारतात बंदी घातलेल्या 36 चिनी अॅप्सना वापरण्यास परवानगी; यात TikTok चा समावेश आहे का? जाणून घ्या
हॅकिंग ट्यूटोरियल आणि सॉफ्टवेअर -
गुगलवर 'हॅकिंग शिका', 'डाउनलोड हॅकिंग टूल्स' किंवा 'कोणाचा पासवर्ड कसा चोरायचा' यासारखे शब्द शोधल्यानेही तुम्ही अडचणीत येऊ शकता. सायबर गुन्हे युनिट्स आणि सुरक्षा एजन्सी अशा प्रकरणांवर सतत लक्ष ठेवतात. जर तुम्ही कोणत्याही संशयास्पद कृत्यात सहभागी असल्याचे आढळले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. भारतात, बेकायदेशीर हॅकिंग हा एक प्रकारचा गुन्हा आहे. यासाठी कठोर शिक्षेची तरतूद देखील आहे.
पायरेटेड चित्रपट -
बरेच लोक मोफत चित्रपट डाउनलोड करण्यासाठी गुगलवर 'पायरेटेड मूव्ही डाउनलोड' किंवा 'फ्री एचडी मूव्ही लिंक्स' सारखे शब्द शोधतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, असं सर्च करणं देखील बेकायदेशीर आहे. कॉपीराइट कायद्यांतर्गत पायरसी हा गुन्हा मानला जातो. जर तुम्ही पायरेटेड कंटेंट डाउनलोड किंवा शेअर केला तर तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
त्यामुळे जेव्हा तुम्ही गुगलवर काहीही सर्च करता त्यावेळी ते बेकायदेशीर आहे की नाही याचा विचार करा. तसेच ऑनलाइन जगात सुरक्षित राहण्यासाठी सायबर कायद्यांबद्दल वाचा आणि नियमांचे पालन करा. याशिवाय, कोणत्याही बेकायदेशीर वेबसाइटला भेट देऊ नका आणि संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा. अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.