मुंबई: काही प्रादेशिक माध्यमांत जिओ स्टारच्या आयटी प्रणालीवर सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. मात्र, या सर्व बातम्या निराधार व खोट्या असून त्यात कोणतेही तथ्य नाही, असे जिओ स्टारने स्पष्ट केले आहे.
कंपनीने अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे की, 'आमचे कोअर सर्व्हर पूर्णतः सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. आमच्या सर्व वापरकर्त्यांचा डेटा, तसेच आमची स्पोर्ट्स व मनोरंजन स्ट्रीमिंग सेवा सुरळीत सुरू आहे.'
कंपनीने आश्वासन दिले आहे की, वापरकर्त्यांचा विश्वास टिकवणे ही त्यांची सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे आणि म्हणूनच सायबर सुरक्षेचे उच्चतम मानके पाळली जात आहेत. भविष्यात कोणताही धोका उद्भवू नये म्हणून त्यांच्या प्रणालींचे सतत निरीक्षण सुरू आहे.
हे स्पष्टीकरण देत जिओ स्टारने अफवांवर पूर्णविराम दिला असून, आपल्या सेवा सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.