Sunday, April 20, 2025 06:19:18 AM

माझ्या पलंगाखाली 'राक्षस' लपलाय.. चिमुकला सांगत होता.. आयाने खाली वाकून पाहिलं तर.. बापरे..

एक चिमुकला त्याला सांभाळणाऱ्या आयासोबत घरी एकटाच होता. तो घाबरलेला होता आणि त्याच्या पलंगाखाली राक्षस बसलाय, अशी तक्रार वारंवार करत होता. मात्र, तो काहीतरी सांगतोय असं वाटून आयाने दुर्लक्ष केलं.. मग..

माझ्या पलंगाखाली राक्षस लपलाय चिमुकला सांगत होता आयाने खाली वाकून पाहिलं तर बापरे

कॅन्सास : अनेकदा लहान मुलं त्यांना सांगितलेलं ऐकत नाहीत. मग त्यांनी ते ऐकावं म्हणून त्यांना भीती घातली जाते.. राक्षस येतो.. पकडून नेतो किंवा राक्षस रात्री पलंगाखाली येऊन बसतो..आदी. लहान मुलांना या गोष्टी खऱ्याही वाटतात आणि भीतीपोटी ती सांगितलेल्याप्रमाणे ऐकतात सुद्धा..

पण अमेरिकेच्या मध्य पश्चिम भागातील कॅन्सास येथील बार्टन कौंटी येथे एक धक्कादायक प्रकार घडला. एक चिमुकला त्याला सांभाळणाऱ्या आयासोबत घरात एकटाच होता. तो घाबरलेला होता आणि त्याच्या पलंगाखाली राक्षस बसलाय, अशी तक्रार वारंवार करत होता. मात्र, तो काहीतरी सांगतोय असं वाटून आयाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्या पलंगाखाली राक्षस नाही, असं सांगून त्याची समजूतही काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी ऐकेना म्हणून त्याच्या हट्टाखातर तिनेही पलंगाखाली वाकून पाहिलं अन् तिचीही गाळणच उडाली.. कारण तो चिमुकला खरं सांगत होता.

हेही वाचा - माकडा माकडा हुप.. वाघाला बसवलं चूप! पाहा माकडाची शिकार करायला गेलेल्या वाघाची फजिती, पाहा VIDEO

तिथं आयानं ते पाहिलं त्याची तिनं कधी कल्पनाही केली नव्हती. तिचा यावर विश्वासच बसत नव्हता. कारण, मुलाच्या पलंगाखाली खरोखरच कुणीतरी होतं आणि आता त्याचीही नजर मुलाच्या आयाच्या नजरेशी भिडली. तिने त्याला तू कोण आहेस म्हणून दरडावून विचारलं. त्याची तिच्यासोबत झटापटही झाली. या गडबडीत तो लहान मुलगाही पलंगावरून खाली पडला. यानंतर पलंगाखाली लपलेला तिथून पळून गेला.

कॅन्सासमधील एका शेरीफ कार्यालयाच्या बातमीपत्रानुसार, एका बेबीसिटरने लहान मुलाच्या पलंगाखाली वाकून पाहिल्यानंतर तिला तेथे खरंच एक माणूस लपलेला दिसला, जो राक्षस आहे, असं वाटून लहान मुलगा घाबरला होता. या 27 वर्षीय माणसाचे नाव  मार्टिन व्हिलालोबोस असं होतं. सध्या त्या लहान मुलाचे कुटुंब राहात असलेल्या घरात तो त्यांच्या आधी राहात होता. तो आयाशी झालेल्या झटापटीनंतर तिथून निघून गेला तरी पोलिसांनी नंतर त्याला पकडले. त्याला घरात घुसण्याच्या गुन्ह्यासाठी 4 कोटी रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे घर असलेल्या भागात सुमारे 15 हजारांची लोकसंख्या आहे. लहान मुलाच्या घरात लपलेला आणि नंतर पोलिसांना सापडलेला माणूस जामीनावर सुटलेला होता. त्यानंतर तो या घरात येऊन लपला होता. आता अटक झाल्यानंतर त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांमध्ये गंभीर घरफोडी, गंभीर मारहाण आणि मुलांना धोका निर्माण करणे यांचा समावेश आहे. आता त्याला जामीन मिळणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा - थडथड भांडी पडण्याचा आवाज आला.. पाहते तर काय.. स्वयंपाकघरात होता विषारी साप; मग या महिलेनं काय केलं पाहा..


सम्बन्धित सामग्री