Sunday, August 17, 2025 04:58:18 AM

रील बनवताना थायलंडमध्ये भारतीय पर्यटकावर वाघाचा हल्ला; नेमकं काय घडलं? पहा

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेनंतर लोक सुरक्षा नियमांवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

रील बनवताना थायलंडमध्ये भारतीय पर्यटकावर वाघाचा हल्ला नेमकं काय घडलं पहा
Indian Man Attacked by Tiger in Thailand
Edited Image

Indian Man Attacked by Tiger in Thailand: थायलंडमधील फुकेत येथे एका भारतीय पर्यटकावर वाघाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध टायगर किंग्डममध्ये वाघासोबत रिल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेनंतर लोक सुरक्षा नियमांवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

हेही वाचा- VIDEO : शिकाऱ्याची शिकार..! शार्कने बेसावध मगरीला पकडलं आणि अख्खी मगरच एका घासात केली फस्त!

या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती वाघासोबत चालताना दिसत आहे. त्यानंतर तो वाघासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच फ्रेममध्ये, एक प्रशिक्षक वाघाला बसवण्यासाठी काठीचा वापर करताना दिसत आहे. पण वाघ आक्रमक होतो आणि दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करतो. यानंतर वाघाने हल्ला केलेला व्यक्ती ओरडतानाचा आवाज व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. 

हेही वाचा- साताऱ्यात पहिल्याच पावसामुळे दणादण; रस्त्यावरून गाडी चालवणं अवघड झाल्याने चक्क बाईकच खांद्यावर उचलली

दरम्यान, या व्हिडिओवर अनेक यूजर्संनी कमेंट केली असून अनेकांनी वाघाने हल्ला केलेल्या व्यक्तीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तथापि, भविष्यात असे काही घडू नये म्हणून काही लोकांनी चांगल्या सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली. तसेच वाघाच्या हल्ल्यातील पीडित वाचला का? या प्रश्नाला व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने उत्तर देताना म्हटलं आहे की, 'हो, अर्थातच, किरकोळ दुखापत झाली आहे.'


सम्बन्धित सामग्री