Saturday, August 16, 2025 08:37:02 PM

'हे भयंकर पाप! या धक्क्यातून मी कधीही सावरू शकणार नाही', बाळ झाल्यावर महिलेनं फर्टिलिटी क्लिनिकला कोर्टात खेचलं

'मी या धक्क्यातून कधीही पूर्णपणे बरी होणार नाही किंवा यातून पूर्णपणे पुढे जाणार नाही. माझ्या मुलाची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत राहीन,' असं क्रिस्टीना म्हणाली.

हे भयंकर पाप या धक्क्यातून मी कधीही सावरू शकणार नाही बाळ झाल्यावर महिलेनं फर्टिलिटी क्लिनिकला कोर्टात खेचलं

IVF Clinics Unforgivable Mistake : आयव्हीएफ ट्रीटमेंटद्वारे आफ्रिकन-अमेरिकन बाळाला जन्म दिल्यानंतर एका अमेरिकन महिलेने फर्टिलिटी क्लिनिकवर खटला दाखल केला. 'या धक्क्यातून मी कधीही सावरू शकणार नाही', असं तिने म्हटलं आहे. क्रिस्टीना मुर्रे असे या 38 वर्षीय महिलेचे नाव आहे. तिने बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ आफ्रिकन-अमेरिकन असल्याचे तिला कळले.

क्रिस्टीना आणि तिचा शुक्राणू दाता दोघेही गोरे आहेत. 'मी आनंदी होते. मी आई झाले होते. बाळ खूप छान, सुंदर आणि दोषरहित होते. परंतु हे देखील स्पष्ट होते, की काहीतरी चुकलेले आहे," असे तिने क्लिनिकविरुद्ध खटल्याची घोषणा करताना सांगितले. दुसऱ्या जोडप्याच्या बाळाला जन्म दिल्यावर या अमेरिकन महिलेने फर्टिलिटी क्लिनिकवर खटला दाखल केला. 

'या धक्क्यातून मी कधीही सावरू शकणार नाही'
अनोळखी जोडप्याच्या बाळासाठी नकळत सरोगेट बनल्याचा हा प्रकार झाला. यानंतर अमेरिकन महिलेने फर्टिलिटी क्लिनिकवर खटला दाखल केला, क्लिनिकमधील चुकांबद्दल चिंता व्यक्त केली. ‘या प्रकारामुळे मला जो मानसिक त्रास आणि भावनिक छळ झाला आहे, त्यातून मी कधीही बरी होणार नाही,’ असं तिने म्हटलं आहे.

एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एका अमेरिकन महिलेने अनोळखी जोडप्याच्या बाळाला जन्म दिला आणि झालेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला त्याच्या जैविक पालकांना द्यावे लागले. या प्रकारामुळे नकळत सरोगेट बनल्यानंतर या महिलेने फर्टिलिटी क्लिनिकवर खटला दाखल केला आहे.

हेही वाचा - म्याँव म्याँव.. मांजरीनं चपळाईनं केलं विमान हायजॅक; उड्डाण झालं 2 दिवस लेट, हुश्श.. अखेर अशी आली बाहेर..

क्रिस्टीना प्रसूत होऊन तिने मुलाला जन्म दिला आणि तिला कळले की ते मूल आफ्रिकन-अमेरिकन आहे. यामुळे तिला काहीतरी चुकल्यासारखे वाटले. यामुळे बाळाला जन्म दिल्यानंतर, मुर्रेने अनुवांशिक चाचणीची (डीएनए टेस्ट) मागणी केली आणि तिला आढळले की ती त्या मुलाशी अजिबात संबंधित नाही. 'माझे बाळ अनुवांशिकदृष्ट्या माझे नाही - त्याला माझे रक्त नाही, त्याला माझे डोळे नाहीत, परंतु तो नेहमीच माझा मुलगा राहील,' असे क्रिस्टीनाने भावनिक होत सांगितले. तसेच, 'मी या धक्क्यातून कधीही पूर्णपणे बरी होणार नाही किंवा यातून पूर्णपणे पुढे जाणार नाही. माझ्या मुलाची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत राहीन आणि तो कसा वाढत आहे, माणूस बनत आहे याबद्दल मला नेहमीच उत्सुकता वाटत राहील,' असे ती म्हणाली.

आपण जन्म दिलेले बाळ आपले नसल्याचे समजल्यावर मुर्रेने लगेचच फर्टिलिटी क्लिनिकला कळवले. तिथून मुलाच्या जैविक पालकांना माहिती देण्यात आली. त्यांनी बाळाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आणि बाळ काही महिन्यांचा झाल्यानंतर मुर्रेने स्वेच्छेने बाळाला त्याच्या माता-पित्यांकडे सोपवण्यासाठी स्वतःचा त्याच्यावरील हक्क सोडून दिला.

'तिने पहिल्यांदा तिच्या बाळाला पाहिले, तेव्हा तिला बसलेला धक्का तिला स्पष्टपणे आठवतो. क्रिस्टीना ही एक कॉकेशियन महिला आहे. तिने तिच्यासारख्याच असणाऱ्या शुक्राणू दात्याची निवड केली. मात्र, तिने जन्म दिलेले बाळ आफ्रिकन-अमेरिकन होते. अशा चुका कधीही प्रजनन क्लिनिकमध्ये होऊ नयेत. हे खूप मोठे आणि भयंकर पाप आहे,' असे तिच्या वकिलाने सांगितले.

हेही वाचा - World Record : हे आहेत 100 हून अधिक नातवंडे असलेले आजी-आजोबा! ब्राझीलच्या जोडप्याचा वैवाहिक आयुष्य जगण्याचा विश्वविक्रम

फर्टिलिटी क्लिनिकने याला 'क्वचित घडणारी घटना' म्हटले आहे. क्लिनिकने म्हटले आहे की, 'मुर्रेसोबत जे घडले, ती 'क्वचित घडणारी घटना' होती. अशा प्रकारे इतर कोणताही रुग्ण प्रभावित झालेला नाही'.

'ही चूक ज्या दिवशी उघड झाली त्याच दिवशी आम्ही ताबडतोब सखोल आढावा घेतला आणि रुग्णांचे अधिक संरक्षण करण्यासाठी आणि अशी घटना पुन्हा घडू नये याची खात्री करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय केले,' असे क्लिनिकने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

2011 मध्ये, ओहियोमधील एका महिलेला अशाच प्रकारच्या गर्भाची अदलाबदल झाल्याचा अनुभव आला आणि तिने दुसऱ्या जोडप्याच्या बाळाला जन्म दिला. 2019 मध्ये, न्यू यॉर्कमधील एका जोडप्याने कॅलिफोर्नियातील एका क्लिनिकवर गर्भाची अदलाबदल झाल्याबद्दल खटला दाखल केला होता. या प्रकारामुळे दोन महिलांनी एकमेकांच्या बाळांना जन्म दिला होता


सम्बन्धित सामग्री