Wednesday, June 18, 2025 03:19:31 PM

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडच्या जवळचा दहशतवादी अबू सैफुल्लाह पाकिस्तानात ठार

पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी लष्कराचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याची गोळ्या घालून हत्या केली. भारतात अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप आहे.

मोठी बातमी पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडच्या जवळचा दहशतवादी अबू सैफुल्लाह पाकिस्तानात ठार
Terrorist Abu Saifullah Killed
Edited Image

इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधाराचा जवळचा सहकारी रजाउल्लाह निजामानी उर्फ ​​अबू सैफुल्लाह याला ठार मारण्यात आले. पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी लष्कराचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याची गोळ्या घालून हत्या केली. भारतात अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप आहे. तो लष्करचा संस्थापक दहशतवादी हाफिज सईद आणि सह-संस्थापक सैफुल्ला खालिद यांच्या जवळचा होता. सैफुल्ला खालिदने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता.

प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बदिन जिल्ह्यातील माटली तालुक्यात दहशतवादी अबू सैफुल्लाह मारला गेला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. बराच काळ तो नेपाळमध्ये लष्कर-ए-तैयबाचे काम पाहत होता. हा दहशतवादी नेता लष्करच्या दहशतवाद्यांना नेपाळमार्गे भारतात प्रवेश करण्यास मदत करायचा.

हेही वाचा - 'पाकिस्तानला दशकांपासून न शिकलेला धडा शिकवला...'; लष्कराने शेअर केला ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ

अबू सैफुल्ला उर्फ ​​विनोद कुमार उर्फ ​​मोहम्मद सलीम उर्फ ​​खालिद उर्फ ​​वानियाल उर्फ ​​वाजिद उर्फ ​​सलीम भाई असे लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरचे नाव आहे. तो नेपाळमधील लष्कराचे संपूर्ण मॉड्यूल हाताळत असे. या दहशतवाद्याचे मुख्य काम लष्कराच्या दहशतवादी कारवायांसाठी कॅडर आणि आर्थिक मदत पुरवणे होते.

हेही वाचा - पहलगाम हल्ल्यावेळी ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्त दानिश यांच्या संपर्कात होती...’; हरियाणा पोलिसांचा खुलासा

भारतातील 'या' हल्ल्यांत अबू सैफुल्लाहचा हात - 

दरम्यान, 2001 मध्ये दहशतवादी सैफुल्ला खालिदने उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. 2005 मध्ये दहशतवाद्यांनी बेंगळुरूमध्ये लोकांवर गोळीबार केला होता. तसेच, सैफुल्ला खालिद हा जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे म्हटले जाते. त्यानेच या हल्ल्याचा कट रचला होता. 2006 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट याच गटाने रचला होता.
 


सम्बन्धित सामग्री