Sunday, August 17, 2025 08:16:59 AM

मिरज शासकीय रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणानंतर मोठा निर्णय

मिरज सरकारी रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणानंतर बाह्य तपासणीसाठी कर्मचारी अनिवार्य; सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्यासाठी बदल्या व अतिरिक्त रक्षकांची नेमणूक सुरू.

मिरज शासकीय रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणानंतर मोठा निर्णय

मिरज: मिरज शासकीय रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणानंतर सिव्हिल प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता सांगली आणि मिरज सिव्हिल रुग्णालयांतील कोणत्याही नवजात बाळाच्या बाह्य तपासणीसाठी रुग्णालयातील कर्मचारी बाळासोबत अनिवार्य असणार आहेत.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी पूर्ण होईपर्यंत महिला कर्मचारी बाळासोबत राहणार आहेत. याशिवाय, सुरक्षारक्षक आणि वॉर्डातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्याही करण्यात आल्या आहेत.

रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Pandharpur Wari 2025: वारीला जाता आलं नाही? हरकत नाही, विठोबा येईल तुमच्या घरी; जाणून घ्या कसं

ही कार्यवाही बाळ चोरीप्रकरणामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून, भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री