नाइटी घातलेली महिला, हातावर पट्टी आणि पायात १२ खिळे, महिलेच्या मृतदेहानं खळबळ
बिहारच्या नालंदा जिल्ह्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या अंगावर लाल रंगाची नाइटी होती. तर हातावर पट्टी बांधलेली होती आणि दोन्ही पायांमध्ये प्रत्येकी सहा असे एकूण १२ खिळे त्या मृतदेहाच्या पायावर ठोकण्यात आलेले होते. मृतकाचं वय हे साधरण २६ वर्ष असल्याचं बोललं जात आहे.
ही घटना बिहारमधील हरनौतच्या बहादुरपूर गावाजवळील हायवेच्या कडेला असलेल्या जंगल परिसरात घडली. बुधवारी काही ग्रामस्थांना या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह ओळख पटेपर्यंत सदर रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा - Rajasthan Crime: घर पोहोचायच्या आधीच नववधू बेपत्ता, ट्रेनच्या टॉयलेटमध्ये काय घडलं?
नरबळीचा प्रकार? उलटसुलट चर्चांना उधाण
सदर तरूणीची हत्या अंधश्रद्धेच्या कृत्याशी संबंधित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेची सद्या परिसरात उलटसुलट चर्चा रंगली आहे. ही हत्या तंत्र-मंत्रासाठी किंवा नरबळीच्या उद्देशाने करण्यात आली असावी, असा लोकांचा असा अंदाज आहे. तर काहींनी संबंधित महिला एखाद्या उपचार प्रक्रियेदरम्यान मृत्यूमुखी पडली असावी आणि त्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी तिचा मृतदेह निर्जन ठिकाणी टाकण्यात आला असावा, असा कयास लावला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाविषयी सांगितलं की, या महिलेची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडिया आणि आसपासच्या पोलिस ठाण्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. तसंच या हत्येचे नेमके कारण शोधण्यासाठीचा तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा - भयानक! आधी लोखंडी रॉड गरम केला मग त्याच रॉडने एकाला चटके देत मारले
महिलेच्या दोन्ही पायांत एकूण १२ खिळे ठोकल्याने हा प्रकार अतिशय गंभीर असल्याचे दिसून येते. ही गोष्ट साध्या हत्येची नसून कुठल्या तरी धार्मिक अथवा अघोरी विधीशी संबंधित असावी, अशी चर्चा आहे.