Monday, February 17, 2025 12:17:10 PM

Recording in the girls' changing room
धक्कादायक! मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाइल ठेवून रेकॉर्डिंग

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ही बातमी ऐकून सर्वत्र एकच खळबळ उडालीय. पुण्यातील एका शाळेमध्ये मुलीच्या चेंजिंग रूममध्ये मोबाइलफोन ठेवून रेकॉर्डिंग

धक्कादायक मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाइल ठेवून रेकॉर्डिंग

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ही बातमी ऐकून सर्वत्र एकच खळबळ उडालीय. पुण्यातील एका शाळेमध्ये मुलीच्या चेंजिंग रूममध्ये मोबाइलफोन ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यामुळे विद्यार्थींमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळतंय. धक्कादायक म्हणजे शाळेतील शिपायानेच हा फोन मुलींच्या  चेंजिंग रूममध्ये ठेवली असल्याची माहिती समोर आलीय. 

याबाबत सविस्तर

दिनांक ६ जानेवारी रोजी हा संपूर्ण प्रकार घडला आहे. शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असणाऱ्या किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या. तिथे शाळेतील शिपाई सरोदे हा उपस्थितीत होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले असता त्याने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेऊन रूममध्ये असलेल्या एका स्विच बोर्डवर ठेवला.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

दरम्यान, हा सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि तात्काळ त्यांनी व्हिडीओ मोबाईल मधून डिलीट केला. घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असता त्याने या प्रकाराला नकार दिला.

मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे याच्याकडे चौकशी केली असता त्याने घडलेल्या घटनेची कबुली दिली. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सरोदे याला अटक केली. दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे आता पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 
 


सम्बन्धित सामग्री