Saturday, August 16, 2025 08:19:26 AM

बॅक टू बॅक हिंदी प्रोजेक्ट आणि सईची बॉलिवूडला पडलेली भुरळ!

बॉलिवूड सोबतीने मराठीत सईच्या अभिनयाची जादू सगळ्यांनी पाहिली. 2024 वर्षाची सुरुवात तिने &quotश्री देवी प्रसन्न&quot चित्रपटाने केली आणि वर्षाचा शेवट तिने धगधगत्या &quotअग्नी&quot ने केली आहे.

बॅक टू बॅक हिंदी प्रोजेक्ट आणि सईची बॉलिवूडला पडलेली भुरळ

मुंबई:  वर्ष संपत आलं तरी सई ताम्हणकरच्या कामाची गती अजूनही थांबलेली नाही! 2024 च्या वर्षात सईने बॅक टू बॅक कामं करून तिच्या प्रेक्षकांची निरंतर मने जिंकली आहेत. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये नवनवीन भूमिका साकारत तिने बॉलिवूड आणि मराठी सिनेमा दोन्ही क्षेत्रांत आपला ठसा सोडला आहे. तिच्या अभिनयाची जादू कशी प्रेक्षकांना भुरळ घालते, हे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये स्पष्टपणे दिसून येते.

सईने 2024 मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आपल्या अभिनयाच्या नव्या शिखरावर पोहोचली आहे. "श्री देवी प्रसन्न" ह्या चित्रपटाने तिने वर्षाची सुरुवात केली, आणि "अग्नी" सारख्या धगधगत्या चित्रपटाने वर्षाचा समारोप केला. दोन्ही चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. "भक्षक" आणि "अग्नी" हे हिंदी चित्रपट विशेषत: चर्चेत आले आणि त्यांचे कौतुकही मोठ्या प्रमाणात झाले. त्याचबरोबर, "मानवत मर्डर्स" सारख्या वेब सीरिजमध्ये सईच्या वेगळ्या लूक आणि अभिनयाने प्रेक्षकांना एक नवा अनुभव दिला.

तिने "अग्नी" आणि "भक्षक" सारख्या चित्रपटांमध्ये काम करत बॉलिवूडमध्ये आपली वेगळी आणि हक्काची जागा निर्माण केली आहे. या प्रोजेक्ट्सच्या यशाने सई बॉलिवूडमध्ये आपला प्रभाव ठरवला आहे, आणि आगामी वर्षातही तिची उपस्थिती मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसून येईल. 2024 मध्ये सई "मोस्ट बॅंकेबल स्टार" ठरली आहे, आणि हे तिने आपल्या अभिनयाच्या कलेतून सिद्ध केलं आहे.

सईच्या कामाची विशेषता म्हणजे तिच्या भूमिकांमध्ये वैविध्य. वेगवेगळ्या प्रकारच्या आणि विविध भाषांतील प्रोजेक्ट्समध्ये ती दिसली आहे, ज्यामुळे तिने आपल्या प्रेक्षकांना निरंतर आश्चर्यचकित केलं आहे. तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना एका नवीन शैलीची झलक मिळाली आणि त्यांना तिच्या कामावर भरपूर प्रेम दिलं.

आगामी वर्षात सई आपल्या चित्रपटांमधून आणखी काही धमाकेदार प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. तिने यापूर्वीच "डब्बा कार्टेल" आणि "मटका किंग" या हिंदी चित्रपटांच्या घोषणाही केली आहे. मराठीतही ती "गुलकंद" आणि "बोल बोल राणी" यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.


सम्बन्धित सामग्री