Miss World 2025: 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची सुरुवात तेलंगणातील हैदराबाद येथील HITEX एक्झिबिशन सेंटरमध्ये झाली. या कार्यक्रमात 108 सुंदऱ्यांनी भाग घेतला होता. यावेळी 'मिस वर्ल्ड'चा मुकुट थायलंडमधील एका सुंदर महिलेच्या डोक्यावर सजला आहे. थायलंडची सुंदरी ओपल सुचाता चुआंगश्रीने 'मिस वर्ल्ड 2025'चा किताब मिळवला आहे. परंतु, या स्पर्धेत विजेता होण्याचं भारताचं स्पप्न भंगलं आहे. कारण, नंदिनी गुप्ता 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या टॉप-2 मधून बाहेर पडली आहे.
टॉप 20 च्या घोषणेनंतर, कार्यक्रमाच्या यजमानांनी प्रत्येक खंडातील टॉप 8 मध्ये स्थान मिळवणाऱ्या टॉप 2 सुंदरींची नावे जाहीर केली. 72 व्या मिस वर्ल्ड 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी नंदिनी गुप्ता आशिया आणि ओशनिया श्रेणीत टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाली, परंतु टॉप 2 मधून ती बाहेर पडली. मिस फिलीपिन्स आणि मिस थायलंड आशियाने मिस वर्ल्ड 2025 च्या टॉप 2 मध्ये स्थान मिळवले.
हेही वाचा - Miss World 2025: जगाला मिळाली 72 वी 'मिस वर्ल्ड'! थायलंडची ओपल सुचाता चुआंगश्री ठरली विजेती
यापूर्वी, नंदिनी गुप्ता टॉप चार कॉन्टिनेंटल विजेत्यांपैकी एक होती. टॉप मॉडेल चॅलेंज सेगमेंटमध्ये उर्वरित सुंदरींना कठोर स्पर्धा देऊन तिने हे स्थान मिळवले होते. यानंतर, भारताच्या नंदिनी गुप्ता यांचा सामना युरोपमधील जास्मिन गेरहार्ट (मिस आयर्लंड), आफ्रिकेतील सेल्मा कामन्या (मिस नामिबिया) आणि अमेरिका आणि कॅरिबियनचे प्रतिनिधित्व करणारी ऑरेली जोआकिम (मिस मार्टिनिक) या तीन इतर स्पर्धकांशी झाला. त्यामुळे नंदिनी गुप्ता टॉप 2 मध्ये येऊ शकली नाही. नंदिनीचे 72 व्या मिस वर्ल्डचा किताब जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत नंदिनीने पारंपारिक गिड्डा नृत्य सादर करून सर्वांचे मन जिंकले.
हेही वाचा - बापरे! अभिनेत्री समांथा रुथ प्रभूला झालाय गंभीर आजार ;पोस्ट शेयर करत म्हणाली 'माझा सुंदर दिसण्याचा हट्ट...'
कोण आहे नंदिनी गुप्ता?
21 वर्षीय नंदिनी गुप्ता राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी आहे. 72 व्या मिस वर्ल्ड 2025 चा किताब जिंकण्याचं तिचं स्वप्न भंगल आहे. तिने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 हा किताब जिंकला, ज्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. यावेळी नंदिनी भारताला 7 वा मिस वर्ल्डचा किताब मिळवून देण्यात अपयशी ठरली. मिस वर्ल्डच्या 72 वर्षांच्या इतिहासात, 6 भारतीय सुंदरींनी हा किताब जिंकला आहे, ज्यात रीता फारिया, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, युक्ता मुखी, डायना हेडन आणि मानुषी छिल्लर यांचा समावेश आहे.