Miss World 2025 Winner: 72 वी मिस वर्ल्ड स्पर्धा संपली असून जगाला पुन्हा एकदा एक नवीन 'मिस वर्ल्ड' मिळाली आहे. यावेळी 'मिस वर्ल्ड'चा मुकुट थायलंडच्या एका सुंदरीच्या डोक्यावर सजला आहे. थायलंडची स्पर्धक ओपल सुचाता चुआंगश्रीने 72 वा मिस वर्ल्ड किताब जिंकला आहे. हैदराबादमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओपल सुचाताला मुकुट घालण्यात आला. तथापि, मिस वर्ल्ड स्पर्धेत इथिओपियाची स्पर्धक दुसऱ्या क्रमांकावर होती.
भारताचे स्वप्न भंगले; नंदिनी टॉप-2 मधून बाहेर
72 व्या मिस वर्ल्ड फेस्टिव्हल 2025 चा ग्रँड फिनाले आज हैदराबादमध्ये सुरू झाला. नंदिनी आशियातील खंडीय टॉप-2 मधून बाहेर पडली आहे. सातव्यांदा हा किताब जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले आहे. हा कार्यक्रम तेलंगणाच्या हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा HITEX एक्झिबिशन सेंटरमध्ये झाला.
हेही वाचा - बापरे! अभिनेत्री समांथा रुथ प्रभूला झालाय गंभीर आजार ;पोस्ट शेयर करत म्हणाली 'माझा सुंदर दिसण्याचा हट्ट...'
मिस वर्ल्ड स्पर्धेत 108 देशांतील सुंदऱ्यांनी घेतला सहभाग -
दरम्यान, मिस वर्ल्ड स्पर्धेत 108 देशांतील सुंदरी सहभागी होण्यासाठी आल्या होत्या, त्यापैकी भारताच्या नंदिनी गुप्तासह 40 सहभागींची ग्रँड फिनालेसाठी निवड झाली आहे. तथापि, भारताची नंदिनी या स्पर्धेत आधीच बाहेर पडली होती. आता थायलंडच्या स्पर्धकाने हा किताब जिंकला आहे. मिस वर्ल्डच्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ले या ज्युरीच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर बॉलीवूड अभिनेता सोनू सूद, प्रसिद्ध उद्योजिका सुधा रेड्डी आणि मिस इंग्लंड 2014 कॅरिना टायरेल ज्युरी सदस्य म्हणून उपस्थित होत्या.
हेही वाचा - 'राजकारण बाजूला ठेवा, न्याय द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणावर दीपाली सय्यद म्हणाल्या
तेलंगणाचे मुख्यमत्र्यांची मिस वर्ल्ड स्पर्धेला हजेरी -
तेलंगणाच्या हैदराबाद शहरात आयोजित मिस वर्ल्ड ब्युटी पेजंट स्पर्धेला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी उपस्थित होते. त्यांच्यासोबत दक्षिणेकडील सुपरस्टार चिरंजीवी यांनीही स्पर्धेला हजेरी लावली.