Saturday, August 16, 2025 08:39:15 PM

कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबार; 'या' दहशतवाद्याने स्विकारली जबाबदारी

आरोपी हरजीतने दावा केला आहे की, तो कपिल शर्माच्या काही कमेंट्समुळे संतापला होता. त्यामुळे त्याने कपिलच्या रेस्टॉरंटवर गोळीबार केला.

कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबार या दहशतवाद्याने स्विकारली जबाबदारी
Shooting at Kapil Sharma cafe in Canada
Edited Image

कॅनडा: कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबार झाला आहे. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. कपिल शर्माने कॅनडामध्ये एक नवीन रेस्टॉरंट उघडले आहे. कॅनडाच्या पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. दहशतवादी हरजीत सिंग लाडीने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हरजीत सिंग लाडी हा एनआयएचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. आरोपी हरजीतने दावा केला आहे की, तो कपिल शर्माच्या काही कमेंट्समुळे संतापला होता. त्यामुळे त्याने कपिलच्या रेस्टॉरंटवर गोळीबार केला. 

कपिलच्या कॅफेवर गोळीबार - 

कपिल शर्माने अलीकडेच कॅनडामध्ये एक कॅफे उघडला होता. कपिल शर्मानेही त्याच्या सॉफ्ट लाँचला हजेरीही लावली होती. अलीकडेच कपिल शर्माची पत्नी गिन्नीनेही कॅफेचा व्हिडिओ शेअर केला होता आणि येथे येणाऱ्या लोकांचे आभार मानले होते. आता कॅनडातील एका दहशतवाद्याने कपिलच्या कॅफेवर गोळीबार केला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या गोळीबाराचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.

हेही वाचा - कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसोझा आणि सुगंधा मिश्रा यांना धमकीचा मेल

कॅफेभोवती पोलिस बंदोबस्त तैनात 

प्राप्त माहितीनुसार, कॅनडातील ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे कपिलने KAP'S CAFE नावाचे एक रेस्टॉरंट उघडले आहे. हे कॅफे अनिवासी भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय होत होते. सध्या कॅफे बंद करण्यात आला आहे. कॅफेभोवती पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेवर कपिल शर्माकडून कोणतेही विधान आलेले नाही.

हेही वाचा - बेटिंग ॲप घोटाळ्यात राणा डग्गुबतीसह 29 कलाकार कायद्याच्या कचाट्यात

हरमीत सिंगने घेतली हल्ल्याची जबाबदारी 

दरम्यान, कॅनडामध्ये राहणारा खलिस्तानी दहशतवादी हरमीत सिंग हा कपिल शर्माच्या काही विधानांवर संतापला होता. हरमीत सिंग याने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. कपिल शर्माचे भारतासह इतर देशात देखील अनेक चाहते आहेत. एवढेच नाही तर कपिल शर्माला अनेक देशांमध्ये शोसाठी देखील बोलावले जाते. कपिल शर्माने कॅनडामध्येही अनेक शो केले आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री