Saturday, June 14, 2025 04:23:22 AM

Weather Update: देशातील 'या' 12 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस; IMD जारी केला इशारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 7 दिवसांत ईशान्य भारतातील बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, आज त्रिपुराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

weather update देशातील या 12 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस imd जारी केला इशारा
Edited Image

Weather Update: देशातील अनेक राज्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, समुद्रालगतच्या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, काही जिल्ह्यांमध्ये पूर इशारा देखील जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, आठवड्याच्या शेवटी भारतातील राज्यांमध्ये हवामान कसे राहील ते जाणून घेऊयात. 

भारतीय हवानान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ओडिशा, गंगेचे मैदान पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडणार आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेशातील 75 ते 85 % भाग मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. यासोबतच, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत 85 मिमी पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - Anti Submarine Warfare ARNALA: INS अर्नाळा’ची नौदलात दमदार एंट्री; देशातील पहिले अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट होणार कमिशन

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 7 दिवसांत ईशान्य भारतातील बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 7 जून रोजी त्रिपुराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, 9 ते 11 जून दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय, 9 ते 13 जून दरम्यान अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुढील 7 दिवस उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची 
शक्यता आहे.

हेही वाचा - Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा आराखडा तयार; CRPF, जम्मू काश्मीर पोलिस आणि लष्कर घेणार सुरक्षेची जबाबदारी

याशिवाय, 10 ते 13 जून दरम्यान छत्तीसगड, ओडिशा, बिहार आणि झारखंडमध्ये जोरदार वादळे आणि विजांचा कडकडाटासह पाऊस पडेल. तथापि, गुजरातमधील पंचमहल, दाहोद, वडोदरा, छोटा उदयपूर, नर्मदा, भरूच, सुरत, डांग, नवसारी, वलसाड, तापी, दमण, दादरा, नगर हवेली, राजकोट, पोरबंदर, जुनागड, अमरेली, भावनगर, गिर सोमनाथ, बोटाड आणि दीव येथे वादळांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
 


सम्बन्धित सामग्री