Thursday, July 17, 2025 02:41:09 AM

अविश्वसनीय! अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या प्रवाशाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ पाहून खरंतर आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. कारण, विश्वास कुमार हातात मोबाईल घेऊन बाहेर येताना दिसत आहेत.

अविश्वसनीय अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या प्रवाशाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
Vishwas Kumar New Viral Video
Edited Image, X

Vishwas Kumar New Viral Video: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघातातून वाचलेल्या विश्वास कुमार रमेश यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून खरंतर आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. कारण, व्हिडिओमध्ये विमान जळत असल्याचे आणि धुराचे काळे लोट निघत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, विश्वास कुमार हातात मोबाईल घेऊन बाहेर येताना दिसत आहेत. विश्वास कुमारचा हा 17 सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

विश्वास कुमारचा नवीन व्हिडिओ व्हायरल - 

या व्हिडिओमध्ये एअर इंडियाच्या विमानातून निघणाऱ्या ज्वाळा दिसत आहेत. तसेच सर्वत्र काळा धूर दिसत आहे. दरम्यान, विश्वास कुमार हातात मोबाईल घेऊन बाहेर येताना दिसत आहे. विश्वास कुमार यांना पाहून तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित होतात. तेथील, लोकांना विश्वास कुमार यांना उपचारांची आवश्यकता असल्याचं समजते. त्यानंतर ते विश्वास कुमार यांना रुग्णवाहिकेत उपचारासाठी पाठवतात. 

हेही वाचा - विजय रुपाणींच्या निधनाबद्दल गुजरातमध्ये एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर

विमान अपघातातून वाचला विश्वास कुमार रमेशचा जीव - 

अहमदाबादमध्ये 12 जून रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले होते. या विमानात उपस्थित असलेल्या 242 लोकांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, विश्वास कुमार रमेश चमत्कारिकरित्या बचावले. विश्वास कुमार हे 11 अ सीटवर बसले होते. हे सीट आपत्कालीन एक्झिटजवळ होते. अपघातानंतर विमानाचा एक भाग तुटला, ज्यामुळे तो बाहेर पडू शकला. त्याने सांगितले की, आजूबाजूला आग आणि ढिगारा होता. तो कसा वाचला हे त्याला स्वतःला समजू शकले नाही. 

हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातातील 80 पीडितांचे DNA नमुने जुळले, 33 मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द

विश्वास कुमार यांनी सांगितलं की, जेव्हा मी जागा झालो तेव्हा माझ्याभोवती मृतदेह विखुरलेले होते. मला भीती वाटली. मी उठलो आणि पळत सुटलो. लोकांनी मला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. सध्या विश्वास कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास कुमार यांची भेट घेतली. त्यांनी विश्वास कुमार यांना अपघातावेळी नेमकं काय घडलं याबाबत विचारणा केली होती. 


सम्बन्धित सामग्री