Sunday, February 09, 2025 03:58:17 PM

Big opportunity for young entrepreneurs
BUDGET 2025 : मोदी सरकारकडून तरूण उद्योजकांसाठी मोठी संधी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला.

budget 2025   मोदी सरकारकडून तरूण उद्योजकांसाठी मोठी संधी

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करताना तरूण आणि नव उद्योजकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी लघू मध्य उद्योग,गुंतवणूक आणि निर्यात  आदी क्षेत्रात काम करणाऱ्या नवउद्योजकांसाठी महत्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. 

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 

नवउद्योजकांसाठी बजेटमध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आहेत.  

नवउद्योजकांसाठीच्या घोषणा

उद्योगासाठीची गुंतवणूकीची मर्यादा 2.5 पर्यंत म्हणजेच दुपटीने वाढवली जाणार
स्टार्टअप्ससाठी 10 कोटींवरून 20 कोटींपर्यंत अतिरीक्त कर्ज मिळणार 
सुक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 5 कोटींवरून 10 कोटींपर्यंत कर्ज मिळणार
पुढील 5 वर्षांत 1.5 लाख कोटींचे अतिरिक्त कर्जवाटप होणार
27 विशेष क्षेत्रांमधील हमी शुल्क कर्जांसाठी 1 टक्क्यांपर्यंत कमी दर करणार
चांगल्या निर्यातदार लघू उद्योगांसाठी 20 कोटींपर्यंतच्या मुदतीचे कर्ज देणार
उद्यम पोर्टलवरील सूक्ष्म उद्योगांसाठी 5 लाख मर्यादेसह कस्टमाइज्ड क्रेडिट कार्ड 
पहिल्या वर्षी 10 लाख कार्डे जारी केली जाणार आहेत 
स्टार्टअपसाठी 10 हजार कोटींचा एक नवा निधी स्थापन केला जाणार
अनुसूचित जाती आणि जमातींच्या पहिल्यांदाच उद्योजक होणाऱ्यांसाठी एक नवीन योजना
मेक इन इंडियाला पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय उत्पादन अभियान स्थापन करणार

हेही वाचा : Union Budget 2025: अर्थसंकल्पातून पगारदारांना दिलासा
 

वेगवेगळ्या स्टार्टअपमुळे नवउद्योग क्षेत्रात दमदार वाटचाल सुरू होईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

हेही वाचा : Union Budget 2025: अर्थसंकल्पातून काय स्वस्त, काय महाग?
 

या अर्थसंकल्पात पर्यावरणावरही विशेष भर देण्यात आला असून हवामान अनुकूल विकासासाठी घरगुती मूल्यवर्धन सुधारणा तसेच सौर पीव्ही सेल, ईव्ही बॅटरी, मोटर्स आणि कंट्रोलर, इलेक्ट्रोलायझर, विंड टर्बाइन, अति उच्च व्होल्टेज ट्रान्समिशन,उपकरणे आणि ग्रिड स्केल बॅटरीसाठी  निर्मिती करण्यासाठी उद्योग निर्मिती करणाऱ्यांचा या योजनांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मोदी सरकारने सुरूवातीपासून नव उद्योजकांना प्राधान्य देण्यासाठी स्टार्टअप योजना राबवलीय.  त्या स्टार्टअप योजनेसाठी आता आणखीम भर दिला असल्याने देशातील तरूणांना केवळ रोजगारांच्या संधी शोधण्याऐवजी रोजगारनिर्मिती करणारे बनण्याचे ध्येय तरूणांसमोर ठेवलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री