बिहार: बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अंतर्गत एक मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने स्पष्ट केले की, राज्यातील 51 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. यामध्ये 18 लाख मृत व्यक्ती, 26 लाख स्थलांतरित मतदार आणि 7 लाख बनावट नावे असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई SIR चाचणी दरम्यान समोर आलेल्या माहितीच्या आधारे केली जात आहे. या तपासणीत मृत, स्थलांतरित आणि एकाच वेळी दोन मतदारसंघात नोंदणीकृत मतदार यांची ओळख पटली आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्यात 1 लाख बीएलओ (Booth Level Officers), 4 लाख स्वयंसेवक आणि 1.5 लाख कर्मचारी मतदारांशी संपर्क साधून सत्यापनाचे काम करत आहेत. यामध्ये अद्याप फॉर्म न भरलेल्या आणि पत्त्यावर अनुपस्थित असलेल्या मतदारांवर विशेष भर दिला जात आहे.
हेही वाचा - आता 'या' राज्यातील महिलांना मालमत्ता खरेदीवर स्टॅम्प ड्युटीमध्ये मिळणार 1 टक्के सवलत
तथापी, राज्यातील प्रमुख 12 राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसोबत बैठका घेऊन त्यांना 21.36 लाख मतदारांची यादी दिली गेली आहे, जे फॉर्म न भरता अनुपस्थित आहेत. 52.30 लाख मतदारांमध्ये मृत, स्थलांतरित किंवा डुप्लिकेट मतदारांचा समावेश आहे. या निर्णयामुळे बिहारमधील आगामी निवडणुकीतील मतदार यादी अधिक पारदर्शक आणि शुद्ध होणार असल्याचा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा - 8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 'या' दिवसापासून लागू होणार आठवा वेतन आयोग
SIR म्हणजे काय?
SIR ही मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठीची निवडणूक आयोगाची विशेष मोहीम आहे. ही मोहीम मतदार यादीतील अचूकता वाढवण्यासाठी राबवली जाते. कोणीही नागरिक मतदार यादीत नाव जोडणे, वगळणे किंवा दुरुस्ती यासाठी फॉर्म 6, 7, किंवा 8 भरू शकतो.