मुंबई : आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीतील सर्वात मोठा सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. 2017 साली झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमींमध्येही उत्सुकता आहे.यसीसी चॅम्पियन ट्रॉफीतील पकिस्तानचा हा दुसरा सामना आहे. पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध झाला असून या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीच्या उंपात्य फेरीत प्रवेश करायचा असल्यास पाकिस्तानला हा सामना जिंकावा लागणार आहे. दुसरीकडे भारताने या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध झाला होता. त्यामुळे हा सामना जिंकल्यास भारताच्या गुणतालिकेत वाढ होणार असून, उपांत्यफेरी गाठणं भारतासाठी सोपं होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण काही वादांमुळे आणि सुरक्षेच्या कारणात्सव भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये होणार आहे. दुबईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरु शकते.असा अंदाज क्रिकेट अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, शुभमन गिल, विराट कोहली, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
हेही वाचा : परळीत मुंडे समर्थकांचा सुरेश धसांना विरोध; दाखवले काळे झेंडे
पाकिस्तानी संघ
बाबर आजम, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (कॅप्टन-विकेटकीपर), सलमान अली आगा, कामरान गुलाम, फहीम अशरफ, खुशदिल शाह, हारिस रौफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि अबरार अहमद.
दोन देशांमधील लढती
भारत-पाकिस्तान यांच्यात एकूण 135 वनडे सामने
पाकिस्तानचा 73 सामन्यांत विजय मिळवला
भारताने 57 सामने जिंकले
तर 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही
हेही वाचा : पोलीस अधिकारी महाजन यांना सस्पेंड करा; सुरेश धस यांची मागणी
पाकचे पारडे जड
आयसीसी चॅम्पियन्सचा रेकॉर्ड पाहता भारत-पाकिस्तान यांच्यात ५ सामने
पाकिस्तान 3-2 अशा जय-पराजयाच्या आकडेवारीसह आघाडीवर आहे
त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात पाकचा वचपा काढण्याची संधी
संयुक्त अरब अमिरातीतील सामने
भारत-पाकिस्तान यांच्यात एकूण 28 सामने खेळले गेले
शाहजाह येथे झालेल्या 24 पैकी 18 सामन्यांत पाकिस्तान जिंकलंय
6 सामन्यांत भारता जिंकला
दुबईत भारताने दोन्ही सामने जिंकले,
तर अबु धाबीत 2 पैकी प्रत्येकी 1-1 सामने दोन्ही संघांनी जिंकलेत