Saturday, August 16, 2025 01:16:10 PM

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारच्या अडचणी वाढल्या; उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा एक एसओपी असायला हवी. तथापि, अॅटर्नी जनरल यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांकडे लक्ष दिले पाहिजे, असं म्हटलं आहे.

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारच्या अडचणी वाढल्या उच्च न्यायालयाने बजावली नोटीस
Karnataka High Court On Bengaluru stampede Case
Edited Image

Bengaluru Stampede Case: बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करताना झालेल्या चेंगराचेंगरीबाबत कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. न्यायालयाने या प्रकरणाबाबत सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले आहे की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा एक एसओपी असायला हवी. तथापि, अॅटर्नी जनरल यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांकडे लक्ष दिले पाहिजे, असं म्हटलं आहे. 

दरम्यान, अटर्नी जनरलने सांगितले की, सरकारने हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतले आहे. तिथे फक्त एकच रुग्णवाहिका होती. प्रश्न असा होता की, ती त्यावेळी पुरेसी नव्हती. तथापि, न्यायालयाने म्हटले की, या दुर्घटनेचे कारण शोधण्याच्या आणि भविष्यात ते कसे रोखायचे या विषयावर आम्हाला अनेक व्यक्तींकडून पत्रे मिळाली आहेत. आम्ही राज्य सरकारला नोटीस बजावतो.

हेही वाचा- बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांनी तयारीसाठी मागितला होता वेळ

क्रिकेट असोसिएशनलाही बजावण्यात आली नोटीस - 

कर्नाटक सरकार बरोबर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनलाही या प्रकरणाबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच, आरसीबीलाही नोटीस देण्यात आली आहे. सर्वांना त्यांचे म्हणणे नोंदवण्याची सूचना देण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत लोहित जी हनुमानपुरा नावाच्या वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालय सुनावणी करत होते. 

हेही वाचा - बेंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणी FIR दाखल; RCB सह 'या' लोकांविरुद्ध गुन्हा दाखल

याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की, राज्य यंत्रणेच्या अपयशामुळे चेंगराचेंगरी झाली. आरसीबीचा चाहता वर्ग मोठा आहे याची राज्याला पूर्ण जाणीव होती. तरीही, पुरेशी सुरक्षा व्यवस्था न करता घाईघाईने विजय साजरा करण्यात आला. पोलिस आणि बीबीएमपी आणि स्टेडियम प्रशासनासह राज्य अधिकारी गर्दी नियंत्रण, वाहतूक, उपचार आणि आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात अपयशी ठरले, असेही याचिकेत म्हटले आहे.
 


सम्बन्धित सामग्री