Sunday, August 17, 2025 05:07:35 AM

जगातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर; भारताचा क्रमांक जाणून बसेल धक्का!

फोर्ब्सने 2025 साठी जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे, तर चीन दुसऱ्या स्थानावर आहे.

जगातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर भारताचा क्रमांक जाणून बसेल धक्का
फोर्ब्सच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा?
Edited Image

Forbes Top 10 Most Powerful Countries: फोर्ब्सने 2025 साठी जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे, तर चीन दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत एकूण 10 देशांचा समावेश आहे. यावेळी भारत पहिल्या 10 मधून बाहेर पडला आहे आणि 12 व्या स्थानावर आला आहे. ही क्रमवारी विविध घटकांच्या आधारे निश्चित केली जाते, ज्यामध्ये नेतृत्व क्षमता, आर्थिक प्रभाव, राजकीय शक्ती, जागतिक युती आणि लष्करी ताकद यासारख्या श्रेणींचा समावेश आहे. फोर्ब्सच्या मते, ही रँकिंग पद्धत पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधील प्राध्यापक आणि यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टशी संबंधित डेव्हिड रीबस्टाईन यांच्या नेतृत्वाखाली बीएव्ही ग्रुपमधील संशोधकांनी विकसित केली आहे.

हेही वाचा - Cheapest cashew in India: देशातील असे ठिकाण जिथे 100-200 रुपयांना मिळू शकतात पिशवी भरून काजू

जगातील 10 सर्वात शक्तिशाली देश - 

  • युनायटेड स्टेट्स 
  • चीन 
  • रशिया 
  • ब्रिटन 
  • जर्मनी
  • दक्षिण कोरिया 
  • फ्रान्स 
  • जपान 
  • सौदी अरेबिया
  • इस्रायल 

फोर्ब्सच्या यादीत भारताचे स्थान काय? 

या यादीत भारत 12 व्या स्थानावर आहे. भारताचा जीडीपी 3.55 ट्रिलियन डॉलर्स असून लोकसंख्या 1.43 अब्जच्या जवळ पोहोचली आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असला तरी, यावर्षी त्याला पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवता आले नाही.

हेही वाचा - तिरुपती मंदिरातील 18 गैर-हिंदू कर्मचाऱ्यांवर कारवाई; कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती किंवा बदलीचा पर्याय निवडण्याचा आदेश

तज्ज्ञांच्या मते, भारताची लष्करी शक्ती आणि आर्थिक वाढ मजबूत आहे. परंतु, इतर देशांनी राजकीय स्थिरता, आंतरराष्ट्रीय युती आणि तांत्रिक नवोपक्रमात देश मागे पडला आहे. तथापि, येत्या काही वर्षांत भारत पहिल्या 10 मध्ये येण्याची शक्यता आहे. तथापी, भारताचा क्रमांक घसरल्याने विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका होत आहे. 
 


सम्बन्धित सामग्री