मुंबई : भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकची म्हणजेच ऑपरेशन सिंदूरची तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांकडून माहिती देण्यात आली. भारत पाकच्या डीडीएमओंमध्ये चर्चा झाली. आज तिन्ही सैन्य दलाची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी डीजी एअर ऑपरेशन्स ए.के. भारती, डीजी मिलिटरी ऑपरेशन्स राजीव घई, डीजी नेव्ही ऑपरेशन्स ए एन प्रमोद आणि मेजर जनरल एस.एस. शारदा उपस्थित होते.
'श्रद्धाळूंवर होणारे दहशतवादी हल्ले जास्त भयावह'
श्रद्धाळूंवर होणारे दहशतवादी हल्ले जास्त भयावह असल्याचे भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी म्हटले आहे. लेफ्टनंट जनरल राजीव घई भारतीय लष्कराचे डीजीएमओ आहेत. डीजीएमओची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी चिनार कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग
एलओसीवर काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. राजीव घई यांनी पाकिस्तानच्या घुसखोरीविरुद्ध रणनीती आखण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. सर्व लष्करी कारवाया डीजीएमओच्या देखरेखीखाली होतात. डीजीएमओ थेट लष्करप्रमुखांना अहवाल देतात. लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्रालय संयुक्तपणे डीजीएमओची निवड करतात.
हेही वाचा : राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांवर पुण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
भारतीय सेनेने फक्त दहशतवादी स्थळांनाच लक्ष्य केलं. मात्र पाकड्यांनी दहशतवाद्यांना साथ दिली अशी माहिती एअर मार्शल ए. के. भारती यांनी दिली. तसेच पाकड्यांची चिनी बनावटीची क्षेपणास्त्र अयशस्वी झाली. पाकिस्तानी ड्रोन एअर गनने पाडण्यात आले असे डीजीएमओच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.