Friday, April 25, 2025 10:12:33 PM

पंतप्रधान मोदींचे 2 वर्षांत 38 परदेश दौरे अन् 258 कोटींचा खर्च! जाणून घ्या, कोणता दौरा होता सर्वात महागडा

PM Modi Foreign Visits : सरकारने राज्यसभेत शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, मे 2022 ते डिसेंबर 2024 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 38 परदेश दौऱ्यांवर सुमारे 258 कोटी रुपये खर्च झाले.

पंतप्रधान मोदींचे 2 वर्षांत 38 परदेश दौरे अन् 258 कोटींचा खर्च जाणून घ्या कोणता दौरा होता सर्वात महागडा

Prime Minister Foreign Visits : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाची सविस्तर माहिती केंद्र सरकारने गुरुवारी (20 मार्च 2025) संसदेत दिली. यानुसार, मोदी यांच्या मे 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या 38 परदेश दौऱ्यांवर जवळपास 258 कोटी रुपये खर्च झाले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा (Pabitra Margherita) यांनी गुरुवारी ही माहिती दिली. 

या दौऱ्यांपैकी सर्वात महागडा दौरा पंतप्रधानांचा जून 2023 मध्ये झालेला अमेरिका दौरा होता, ज्यावर 22 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. मे 2023 मध्ये पंतप्रधानांच्या जपान दौऱ्याशी संबंधित आकडेवारीनुसार, त्यावर 17 कोटी 19 लाख 33 हजार 356 रुपये खर्च झाले, तर मे 2022 मध्ये त्यांच्या नेपाळ दौऱ्यावर 80 लाख 1 हजार 483 रुपये खर्च झाले.
गेल्या तीन वर्षांत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांच्या नियोजनासाठी भारतीय दूतावासांनी किती पैसे खर्च केले, असा प्रश्न खरगे यांनी सरकारला विचारला होता. त्यांनी हॉटेल व्यवस्था, सामुदायिक स्वागत, वाहतूक व्यवस्था आणि इतर विविध खर्च यासारख्या प्रमुख शीर्षकांतर्गत झालेल्या प्रवासनिहाय खर्चाची माहिती देखील मागितली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या मागणीवरून सरकारने आकडेवारी शेअर केली.

हेही वाचा - Toll Price For National Highways : राष्ट्रीय महामार्गांवर टोलच्या किमती कमी होणार? जाणून घ्या, कसं असेल नवं धोरण

मार्गेरिटा यांनी 2022, 2023 आणि 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेल्या परदेश दौऱ्यांवरील देशनिहाय खर्चाचा डेटा सारणी स्वरूपात शेअर केला. या भेटींमध्ये अधिकारी, त्यांच्यासोबत सुरक्षा आणि माध्यमांचे प्रतिनिधीमंडळ होते. माहितीनुसार, जून 2023 मध्ये पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यावर 22 कोटी 89 लाख 68 हजार 509 रुपये खर्च झाले होते. तर, सप्टेंबर 2024 मध्ये त्याच देशाच्या दौऱ्यावर 15 कोटी 33 लाख 76 हजार 348 रुपये खर्च झाले होते.

पंतप्रधान मोदींनी या काळात कोणत्या देशांना भेटी दिल्या?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 ते 2024 दरम्यानच्या कालावधीमध्ये जर्मनी , कुवेत, डेन्मार्क, फ्रान्स, यूएई, उझबेकीस्तान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, दक्षिण अफ्रिका, ग्रीस, पोलंड, युक्रेन, रशिया, इटली, ब्राझील, गयाना या देशांना भेटी दिल्या आहेत.

कोणत्या दौऱ्यावर किती खर्च झाला?
पोलंड – 10 कोटी 10 लाख 18 हजार 686 रुपये
युक्रेन – 2 कोटी 52 लाख 1 हजार 169 रुपये
रशिया – 5 कोटी 34 लाख 71 हजार 726 रुपये
इटली – 14 कोटी 36 लाख 55 हजार 289 रुपये
ब्राझील – 5 कोटी 51 लाख 86 हजार 592 रुपये
गयाना – 5 कोटी 45 लाख 91 हजार 495 रुपये

पंतप्रधान मोदींच्या मे 2022 ते डिसेंबर 2024 या काळातील 38 दौऱ्यांचा खर्च सुमारे 258 कोटी रुपये इतका आहे. मोदींच्या दौऱ्यांची तुलना करण्यासाठी मंत्री मार्गेरिटा यांनी त्यांच्या उत्तरात 2014 च्या आधीच्या काही वर्षांचा डेटा देखील शेअर केला. म्हणजेच, 2014 पूर्वी माजी पंतप्रधानांनी केलेल्या मागील परदेश दौऱ्यांच्या खर्चाची माहिती देखील देण्यात आली आहे.

2014 पूर्वी पंतप्रधानांच्या दौऱ्यांवर झालेला खर्च
अमेरिका (2011) – 10 कोटी 74 लाख 27 हजार 363 रुपये
रशिया (2013) – 9 कोटी 95 लाख 76 हजार 890 रुपये
फ्रान्स (2011) – 8 कोटी 33 लाख 49 हजार 463 रुपये
जर्मनी (2013) – 6 कोटी 2 लाख 23 हजार 484 रुपये

आधीच्या दौऱ्यांसाठी आलेल्या खर्चांच्या आकड्यांमध्ये महागाई किंवा चलनातील चढउतार विचारात घेण्यात आलेले नाहीत.

हेही वाचा - आता सौरऊर्जा, जलविद्युत आणि अणुऊर्जेवर धावणार ट्रेन; जाणून घ्या, कसा आहे भारतीय रेल्वेचा 'फ्यूचर प्लॅन'


सम्बन्धित सामग्री