Tuesday, December 10, 2024 10:44:11 AM

Congress
काँग्रेसने वाटलेल्या लाल संविधानाच्या पुस्तकात कोरी पानं

काँग्रेसचे राहुल गांधी हे ढोंगी आहेत. त्यांच्या सभेवेळी काँग्रेसने वाटलेल्या लाल संविधानाच्या पुस्तकात कोरी पानं होती; असा आरोप भाजपाने केला.

काँग्रेसने वाटलेल्या लाल संविधानाच्या पुस्तकात कोरी पानं

नागपूर : काँग्रेसचे राहुल गांधी हे ढोंगी आहेत. त्यांच्या सभेवेळी काँग्रेसने वाटलेल्या लाल संविधानाच्या पुस्तकात कोरी पानं होती; असा आरोप भाजपाच्या प्रेम शुक्ला यांनी केला.  भारतीय संविधान लाल रंगाचे नाही. पण राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक संविधानाशी संबंधित विषयांवर बोलताना वारंवार लाल रंगाची पुस्तिकासदृश वस्तू दाखवतात. हा प्रकार म्हणजे एकप्रकारे संविधानाचा अपमान करणे आहे. लाल रंगाची पुस्तके आणि लाल रंगातले झेंडे हे भारतात प्रामुख्याने नक्षलवाद्यांचे, डाव्या विचारांच्या संघटनांचे आहेत. यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांचा देशविरोधी कारवाया करणाऱ्या नक्षलवाद्यांशी काही संबंध आहे का ? अशा स्वरुपाचा प्रश्न भाजपाकडून उपस्थित करण्यात आला. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo