Nag Panchami 2025: यंदा 29 जून रोजी नाग पंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते आणि सर्पांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, नाग पंचमीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्यास नाग देव आणि भगवान शंकराचे विशेष आशीर्वाद मिळतात, तसेच जीवनातील त्रास, संकटे दूर होतात. नाग पंचमीच्या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात ते जाणून घेऊयात?
नाग पंचमीला कोणत्या वस्तूंचे दान करावे?
सर्पमित्रांना या गोष्टींचे दान करा -
सर्पमित्रांना अन्न, कपडे व दक्षिणा दान करा. यामुळे जीवनातील विघ्न दूर होतात.
ब्राह्मण भोजन -
नाग पंचमीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन घालणे शुभ मानले जाते. यामुळे पितृ दोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात.
चांदीच्या नागाचे दान -
शिवमंदिरात चांदीच्या नागाचे दान केल्यास कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.
दूध व तांदूळ दान -
या दिवशी दूध दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. दूध दान केल्याने तुम्हाला भीतीपासून मुक्तता मिळते आणि सर्पदेवता देखील तुमच्यावर प्रसन्न होतात. धन आणि समृद्धी मिळविण्यासाठी, तुम्ही नाग पंचमीच्या शुभ प्रसंगी तांदूळ दान करू शकता.
हेही वाचा - Nag Panchami 2025: नागपंचमीची पूजा कशी करतात, चुकूनही 'या' गोष्टी करु नये
लोखंड आणि मीठाचे दान -
खराब ग्रहदशा दूर करण्यासाठी लोखंड आणि मीठाचे दान केल्यास अनेक अडचणी दूर होतात. तसेच गरजूंना कपडे, अन्न, पैसे इत्यादी स्वरूपात दान देण्याला या दिवशी विशेष महत्त्व दिले जाते.
हेही वाचा - Mars Transit: अखेर 'या' राशींची मंगळ-केतू युतीतून सुटका, आता होणार सुख-समृद्धीचा वर्षाव; जाणून घ्या
नाग पंचमीला केलेले दान केवळ पुण्य मिळवण्यासाठी नाही, तर आपल्या कर्मातील दोष, ग्रहबाधा आणि अज्ञात संकटांपासून सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. दान करताना श्रद्धा आणि शुद्ध मन आवश्यक आहे. यामुळे दानाचे पुण्य आणि आशीर्वाद अधिक प्रभावी ठरतात.
(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)