Sunday, August 17, 2025 05:06:28 AM

Share Market News: भारतीय शेअर बाजाराची चिंताजनक स्थिती कायम; मार्चच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी काढले 24,753 कोटी

Share Market News: मार्चच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 24,753 कोटी रुपये काढून घेतले आहेत. जानेवारी-फेब्रुवारीचे आकडेही धक्कादायक आहेत.

share market news भारतीय शेअर बाजाराची चिंताजनक स्थिती कायम मार्चच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी काढले 24753 कोटी

Share Market News: परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून सतत पैसे काढून घेत आहेत. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी केलेली निव्वळ विक्री 24 हजार 753 कोटी रुपयांवर पोहोचली. सततच्या विक्रीच्या दबावामुळे बाजारातील स्थिरतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. परदेशी गुंतवणूकदार भारताच्या आर्थिक आणि कॉर्पोरेट कामगिरीबद्दल सावध राहात आहेत.

परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून सतत पैसे काढत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या आकडेवारीनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) केलेली निव्वळ विक्री 24,753 कोटी रुपयांवर पोहोचली. ऑक्टोबर 2024 पासून बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स 13% नी घसरला आहे, तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 22% आणि 25% ने घसरले आहेत.

हेही वाचा - Reciprocal Tariffs : ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीच्या धोरणामुळे भारतीय निर्यातदारांचे 700 कोटींचे नुकसान होणार?

बाजारातील स्थिरतेबद्दल वाढती चिंता
येत्या काळात अजून किती प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळतील, याविषयी तज्ज्ञ अंदाज लावत आहेत. 2025 मध्ये एकूण निव्वळ काढली जाणारी रक्कम 1 लाख 37 हजार 354 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. सततच्या विक्रीच्या दबावामुळे बाजारातील स्थिरतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. तसेच, परदेशी गुंतवणूकदार भारताच्या आर्थिक आणि कॉर्पोरेट कामगिरीबद्दल सावध राहणे पसंत करत आहेत.

भारतीय कंपन्यांकडून मिळणारी कमकुवत कमाई, अपेक्षेपेक्षा कमी जीडीपी वाढ आणि अमेरिकन डॉलर निर्देशांकात झालेली तीव्र वाढ ही विक्री सुरू ठेवण्यामागील कारणे आहेत. मूल्यांकनाच्या चिंता देखील एफपीआयच्या स्थलांतरात कारणीभूत ठरल्या आहेत.

एसआयपी गुंतवणुकीवरही परिणाम
शेअर बाजाराच्या घसरत्या आलेखाचा परिणाम एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या नव्या गुंतवणूकदांवरही झाला आहे. कारण गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत असलेल्या एसआयपी गुंतवणुकीमध्ये मोठी घट होताना दिसत आहे. मात्र, या क्षेत्रातील तज्ज्ञ एसआयपीमधील गुंतवणूक न थांबवण्याचा सल्ला देत आहेत. शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांनी ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करणे थांबवणे अयोग्य ठरेल, असे अनेक तज्ज्ञांनी म्हटले होते. सध्याची शेअर बाजार सुधारणा (मार्केट करेक्शन) ही कोरोनानंतरच्या गुंतवणूकदारांसाठी पहिली मोठी सुधारणा (मार्केट करेक्शन) आहे आणि ती स्वाभाविक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये काय होती परिस्थिती?
गेल्या फेब्रुवारी महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, परदेशी गुंतवणूकदारांनी 34, 574 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. जानेवारीमध्ये, एफपीआयने भारतीय शेअर बाजारातून 78.027 कोटी रुपये काढले आहेत. 2024 मध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीत (एफपीआय) मोठी घट झाली.

हेही वाचा - 'हा' ग्रुप भारतात करणार 5 हजार कोटींची गुंतवणूक; 15 हजार जणांना मिळणार रोजगार

बाजारातील अस्थिरतेबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?
शेअर बाजारातील अस्थिरतेबद्दल प्रश्न विचारला असता निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'याबद्दल विचारणे म्हणजे जग शांत होईल का? युद्धे संपतील का? लाल समुद्र सुरक्षित राहील का? समुद्री चाचे राहणार नाहीत का? असे विचारण्यासारखे आहे. मी यावर टिप्पणी देऊ शकते का? किंवा तुमच्यापैकी कोणी टिप्पणी देऊ शकेल का? असा सवालही अर्थमंत्र्यांनी केला. 
 


सम्बन्धित सामग्री