Bangladesh New Currency Note
Edited Image
ढाका: बांगलादेशच्या अंतरिम सरकारने रविवारी नवीन चलनी नोटा जारी केल्या. बांगलादेशचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो नवीन चलनी नोटांमधून काढून टाकण्यात आले. आता बांगलादेशच्या नवीन चलनी नोटांवर शेख मुजीबुर रहमान यांच्याऐवजी हिंदू आणि बौद्ध मंदिरांचे चित्र छापण्यात आले आहे. शेख मुजीबुर रहमान हे पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील आहेत. यापूर्वी त्यांचा फोटो बांगलादेशच्या सर्व चलनी नोटांवर छापण्यात आला होता. गेल्या वर्षीच बांगलादेश बँकेने घोषणा केली होती की ते नवीन चलनी नोटा जारी करण्यावर काम करत आहेत.
दरम्यान, बांगलादेश बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसेन खान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, नवीन चलन बांगलादेशातील नैसर्गिक लँडस्केप आणि ऐतिहासिक स्थळे प्रदर्शित करण्यावर लक्ष केंद्रित करते. नवीन मालिका आणि डिझाइन अंतर्गत, नोटांवर मानवी प्रतिमा नसतील, परंतु नैसर्गिक लँडस्केप आणि पारंपारिक स्थळे प्रदर्शित केली जातील.
हेही वाचा - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या अडचणी वाढल्या; अटक वॉरंट जारी
बांगलादेशातील नोटांवर हिंदू, बौद्ध मंदिरांना प्राधान्य -
आता बांगलादेशातील नोटांवर हिंदू, बौद्ध मंदिरांचे चित्र, दिवंगत जैनुल आबेदीन यांच्या कलाकृती आणि 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहणारे राष्ट्रीय शहीद स्मारक यांचा समावेश असेल. बांगलादेश बँकेने तीन वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा जारी केल्या आहेत.
हेही वाचा - युक्रेनचा रशियाच्या 2 हवाई तळावर ड्रोन हल्ला! 40 हून अधिक विमाने नष्ट केल्याचा दावा
प्राप्त माहितीनुसार, बांगलादेशातील नवीन नोटा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयातून जारी करण्यात आल्या आहेत. यानंतर त्या देशभरातील इतर कार्यालयांमधून जारी केल्या जातील. बांगलादेशने आपले चलन बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1972 मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बांगलादेशाने आपले चलन बदलले होते.