Sunday, August 17, 2025 12:24:53 AM

PAN Card वापरून मिळू शकते 5 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज; काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या

अनेक बँका आणि वित्तीय संस्था आता पॅन कार्डच्या आधारे 5 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देत आहेत. तथापि, यासाठी आधार कार्ड पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे, अन्यथा कर्ज प्रक्रियेत विलंब होऊ शकतो.

pan card वापरून मिळू शकते 5 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज काय आहे प्रक्रिया जाणून घ्या
Personal Loan with Pan Card प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

PAN Card Loan: पॅन कार्ड आता केवळ कर आणि ओळखीचं प्रमाणपत्र म्हणून उपयुक्त नाही तर तुमच्या आर्थिक गरजांसाठी देखील उपयुक्त आहे. अनेक बँका आणि वित्तीय संस्था आता पॅन कार्डच्या आधारे 5 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देत आहेत. तथापि, यासाठी आधार कार्ड पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे, अन्यथा कर्ज प्रक्रियेत विलंब होऊ शकतो. तुम्हालाही पॅन कार्डवर कर्ज काढायचं असेल, तर याची प्रक्रिया नेमकी काय आहे? ते जाणून घेऊयात. 

पॅन कार्ड वैयक्तिक कर्ज काढण्यासाठी लागणारी  कागदपत्रे - 

- ओळखपत्र (आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र)
गेल्या तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- गेल्या दोन महिन्यांचा पगार स्लिप किंवा पगार प्रमाणपत्र

पॅन कार्ड वैयक्तिक कर्जासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता, ज्यामध्ये मूलभूत तपशील भरल्यानंतर, पॅन कार्डद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. कर्जाची रक्कम आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाऊ शकते आणि 6 ते 96 महिन्यांच्या ईएमआयद्वारे परतफेड केली जाऊ शकते.

हेही वाचा - भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर चिनी कंपन्यांना मोठे नुकसान; अब्जावधींचे शेअर्स कोसळले

पॅन कार्ड वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा?

- सर्वप्रथम, पॅन कार्डच्या आधारे वैयक्तिक कर्ज देणारी बँक किंवा एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी) निवडा.
- त्यांच्या वेबसाइटला भेट द्या आणि व्याजदर, कर्जाची रक्कम आणि अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा.
- नंतर “आता अर्ज करा” वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा. ओटीपी आल्यावर तो भरा.
- यानंतर, अर्ज फॉर्ममध्ये पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि पिन कोड भरा.
- "पुढे जा" वर क्लिक करा आणि कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडा.
- शेवटी केवायसी तपशील भरून फॉर्म सबमिट करा.

हेही वाचा - कंगाल पाकिस्तानकडे सध्या सोन्याचा साठा किती आहे? भारताची ही स्थिती

कोणाला मिळेल कर्ज - 

या कर्जासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. यासोबतच, अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. पॅन कार्ड आधारित कर्ज सुविधा विशेषतः ज्यांना त्वरित आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी दिलासा देणारी ठरू शकते.
 


सम्बन्धित सामग्री