नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फोनवरुन चर्चा केली. आशियातील ताज्या घडामोडींवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेची माहिती पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करुन दिली.
फोनवरील चर्चेत अतिरेक्यांना आपल्या विश्वात स्थान नाही. पण निर्माण झालेला प्रादेशिक तणाव नियंत्रणात ठेवण्यासासाठी तातडीने उपाय करणे आवश्यक असल्याच्या मुद्यांवर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
इस्रायलच्या पंतप्रधानांचा इराणच्या नागरिकांना संदेश
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या नागरिकांना उद्देशून व्हिडीओ संदेश प्रसारित केला आहे. अत्याचारी खोमेनी राजवटीच्या जोखडातून तुमची मुक्तता जग कल्पना करतंय त्याच्या आधीच होईल, असा विश्वास नेतन्याहू यांनी व्यक्त केला आहे. हा संदेश प्रसारित झाल्यानंतर नेतन्याहू आणि मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली.