Sunday, August 17, 2025 08:16:00 AM

२०३४चा फुटबॉल वर्ल्डकप सौदी अरेबियात रंगणार, फिफाची अधिकृत घोषणा

२०३४ साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचे (FIFA World Cup) आयोजन सौदी अरेबिया (Saudi Arabia) करणार असल्याची घोषणा फुटबॉलची सर्वात मोठी आणि सर्वोच्च संघटना असलेल्या फिफाने केलीआहे.

२०३४चा फुटबॉल वर्ल्डकप सौदी अरेबियात रंगणार
फिफाची अधिकृत घोषणा

झ्युरिक : २०३४ साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचे (FIFA World Cup) आयोजन सौदी अरेबिया (Saudi Arabia) करणार असल्याची घोषणा फुटबॉलची सर्वात मोठी आणि सर्वोच्च संघटना असलेल्या फिफाने केलीआहे. याशिवाय २०३० फिफा विश्वचषकही जाहीर झाला आहे. २०३० च्या विश्वचषकाचे आयोजन स्पेन (Spain), पोर्तुगाल (Portugal) आणि मोरोक्को (Morocco) हे संयुक्तपणे करतील. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो (Gianni Infantino) यांनी ही घोषणा केली. यजमानपदासाठी सौदी अरेबियासमोर कोणतेही आव्हान नव्हते. फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी झ्युरिक येथे झालेल्या बैठकीत २०० हून अधिक सदस्य देशांनी एकमताने याला मंजुरी दिली. 

सौदी अरेबियाच्या यजमान हक्कांची घोषणा करताना, फिफा अध्यक्ष इन्फँटिनो म्हणाले: 'आम्ही फुटबॉल अधिक देशांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला फिफा विश्वचषकात अधिकाधिक संघांचा सहभाग हवा आहे. याव्यतिरिक्त, FIFA आणि सौदी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की २०३४ विश्वचषकाचे यजमानपद महिलांसाठी स्वातंत्र्य आणि अधिकारांचा विस्तार करण्यासह महत्त्वपूर्ण बदल केले जातील. झ्युरिक (Zürich) येथे झालेल्या बैठकीत महिला फिफा विश्वचषक (FIFA Women's World Cup)  स्पर्धेच्या आयोजनाबाबतही घोषणा करण्यात आली. २०२७ मध्ये होणारा महिला विश्वचषक २४ जून ते २५ जुलै दरम्यान ब्राझीलमध्ये खेळवला जाईल, अशी घोषणा फिफाने मंगळवारी केली. दक्षिण अमेरिकेतील एखाद्या देशात ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली जाणार आहे. महिला विश्वचषक स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत.

स्पेन (Spain) हा या स्पर्धेचा सध्याचा चॅम्पियन आहे. त्यांनी २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या स्पर्धेत महिला विश्वचषक जिंकला होता. FIFA पुढील वर्षी स्पर्धेसाठी ब्राझीलची यजमान शहरे आणि स्टेडियमची घोषणा करण्याची शक्यता आहे. एकूण 12 स्टेडियम्सनी सामन्याच्या आयोजनासाठी इच्छा व्यक्त केली आहे. या मैदानांवर २०१४ मध्ये पुरुषांच्या विश्वचषक सामन्यांचे आयोजन केले होते.

 


सम्बन्धित सामग्री