मुंबई : अभिनेता सैफ अली खान यांच्यावर वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी बुधवारी रात्री चाकूने हल्ला झाला. यानंतर त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांना कडक तपासाला सुरूवात केली.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात पोलिसांना एका संशयिताला ताब्यात घेतले होते. आता पोलिसांना संशयित हल्लेखोराची ओळख पटली आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आला आहे. सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आरोपीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील मोठी अपडेट समोर
अभिनेता सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्या वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 311, 312, 331(4), 331(6), 331(7) अंतर्गत केला गुन्हा दाखल दरोडा, प्राणघातक शस्त्रांसह दरोडा, घरात बेकायदेशीरपणे घुसणे (हाऊस ट्रेसपास), घरफोडी तसेच रात्रीच्या वेळी घोरपडी करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना संशय हल्लेखोराची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल येणार असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले आहे.