Sunday, June 22, 2025 09:00:31 PM

11अ नव्हे तर विमानाचा हा भाग आहे सर्वात सुरक्षित! विमान अपघातानंतरही वाचू शकतो जीव

अहमदाबाद विमान अपघातानंतर, लोकांना विमानातील 11ए सीटचे महत्त्व समजले आहे. तथापि, ही सीट कोणालाही तशी दिली जात नाही. यासाठी काही अटी आहेत. तज्ञांच्या मते, प्रत्येक विमानातील सीटची व्यवस्था वेगळी असते.

11अ नव्हे तर विमानाचा हा भाग आहे सर्वात सुरक्षित विमान अपघातानंतरही वाचू शकतो जीव
Edited Image

नवी दिल्ली: विमान प्रवास करणे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, अहमदाबाद विमान अपघातानंतर आता हे स्पप्न भीतीत बदलले आहे. एअर इंडिया विमान अपघातानंतर, अनेकांनी त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची योजना सोडून दिली आहे. केवळ भारतीयच नाही तर परदेशातील लोकही विमानाने प्रवास करण्यास आता घाबरत आहेत. तुमची ही भीती कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला विमानातील सुरक्षित जागेबद्दल सांगणार आहोत, जिथे बसलेल्या व्यक्तीचे जीव वाचण्याची शक्यता इतर जागांपेक्षा जास्त असते.

हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातानंतर सरकारने उचलले मोठे पाऊल! हवाई अपघात रोखण्यासाठी आता करणार 'हे' काम

प्रत्येक विमानातील सीटची व्यवस्था वेगळवेगळी - 

अहमदाबाद विमान अपघातानंतर, लोकांना विमानातील 11ए सीटचे महत्त्व समजले आहे. तथापि, ही सीट कोणालाही तशी दिली जात नाही. यासाठी काही अटी आहेत. तज्ञांच्या मते, प्रत्येक विमानातील सीटची व्यवस्था वेगळी असते. अशा परिस्थितीत, कोणत्याही एका सीट नंबरला सुरक्षित म्हणणे थोडे चुकीचे ठरेल. 'फ्लाइट सेफ्टी फाउंडेशन' या ना-नफा संस्थेचे संचालक मिशेल फॉक्स म्हणतात की, प्रत्येक फ्लाइटमध्ये 11ए सीट ही आपत्कालीन सीट नसते. प्रत्येक विमानात ही सीट दरवाज्याजवळ नसते आणि अपघातानंतर अनेक वेळा दरवाजे जाम होतात.

हेही वाचा - आज एअर इंडियाची 8 उड्डाणे रद्द; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या

विमानात मागे बसल्यास जीव वाचू शकतो - 

दरम्यान, 2007 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की विमानाच्या मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना वाचण्याची शक्यता जास्त असते. यासोबतच मधली सीट देखील सुरक्षित असते. जेव्हा विमान हवेतून पडते तेव्हा विमानाचा पुढचा भाग जमिनीकडे असतो. पुढचा भाग खूप वेगाने खाली येतो. अशा परिस्थितीत समोर बसलेल्या लोकांचा जीव अधिक धोक्यात असतो. याशिवाय, पंखांजवळ बसणे देखील खूप धोकादायक मानले जाते, विमानाचे संपूर्ण इंधन पंखांमध्ये भरलेले असते. म्हणूनच, जेव्हा अपघातात इंधनाला आग लागते तेव्हा पंखांजवळ बसलेले लोक सर्वात आधी अडकतात.
 


सम्बन्धित सामग्री