Sunday, December 01, 2024 10:24:35 PM

Amit Shah
'हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा लागू होणार'

हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा लागू होणार असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा लागू होणार

नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा लागू होणार असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ते महाराष्ट्र दौऱ्यावर नाशिक येथे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनावेळी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर झाले. एकमताने हे विधेयक संसदेच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश समितीला देण्यात आले. हा अहवाल येण्याआधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय आत्मविश्वासाने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना वक्फ सुधारणा लागू होणार असे सांगितले. हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा लागू होणार असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo