Tuesday, July 29, 2025 08:06:33 AM

पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला नागपूरात दरवर्षी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत संबोधन करीत असतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर असणार आहेत.

पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच व्यासपीठावर

मुंबई : हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला नागपूरात दरवर्षी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत संबोधन करीत असतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी संत्रानगरी नागपूर संपूर्ण भगवी झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे नागपूरातील अनेक चौक भगवेमय झाले आहेत. चौका चौकात भाजपचे झेंडे आणि भगव्या पताका उभारल्या गेल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला पोहचला आहे. नागपुरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून पंतप्रधानांचा ताफा जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. 

पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक पाडव्याला एकाच व्यासपीठावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणजेच गुढी पाडव्याला नागपूर दौऱ्यावर आहेत. सालाबादप्रमाणे गुढी पाडव्याला नागपूरमध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत नागरिकांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत गुढी पाडव्याला एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नागपूर वासियांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 

हेही वाचा : फिर्यादी शिवराज देशमुख यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा कसा असेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढी पाडव्याला नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत. नागपूर येथे मोदी विविध ठिकाणांना भेटी  देणार आहेत. तसेच मोदी-मोहन भागवत एकाच मंचावर येणार आहेत. पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त नागपूर पोलिसांकडून  सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांसह 4 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या करणास्तव भाजपकडून स्वागताची तयारी करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा असल्याने भाजपकडून 47 चौकामध्ये शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू झाली होती. मात्र आता सुरक्षा व्यवस्थेच्या कारणामुळे त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे. 


सम्बन्धित सामग्री