नवी मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्याच्या कानाकोपऱ्यात बससेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असले तरी, डोंबिवली आणि पनवेल दरम्यानचा एक महत्त्वाचा शहरी मार्ग दुर्लक्षित आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांच्या सेवा फक्त चार सकाळच्या फेऱ्यांपुरत्या मर्यादित केल्या आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जास्त मागणी असूनही, कार्यालयीन कर्मचारी, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी विश्वसनीय वाहतुकीपासून वंचित आहेत. तसेच दुपारी किंवा संध्याकाळी परतीच्या सेवा नसल्यामुळे अनेक कर्मचारी तळोजा आणि पनवेल येथे तासन्तास अडकून पडत आहेत.
हेही वाचा - कुर्ल्यातील 9000 झाडांची कत्तल थांबवा! आदित्य ठाकरेंची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी
तथापि, डोंबिवलीमध्ये कोणताही माहिती काउंटर नाही आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन (केडीएमटी) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की एमएसआरटीसीच्या कामकाजात त्यांची कोणतीही भूमिका नाही. तसेच पनवेल बस डेपोचे तात्पुरते प्रभारी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी वाहतूक कोंडी हे या घटनेचे मुख्य कारण असल्याचं म्हटलं आहे. पनवेल ते डोंबिवली दरम्यानचा प्रवास पूर्वी सुमारे अडीच तासांचा होत असे. आता, कल्याण फाट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे, एका फेरीसाठी पाच ते सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. चालक आणि वाहक थकतात आणि त्यांना दुसऱ्या मार्गावर पाठवता येत नाही, असं ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - पुण्यातील अनेक भागात बत्तीगुल! केबल बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित
मिड डेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हात्रे यांनी म्हटलं आहे की, अहिल्या नगरहून निघणाऱ्या बसेस वेळेवर कल्याणला पोहोचतात, परंतु त्यानंतर, कल्याण फाटा-पनवेल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबते. याचा कल्याण-पनवेल आणि डोंबिवली-पनवेल या दोन्ही सेवांवर परिणाम होतो. आम्हाला पनवेल-रेतीबंदर (मुंब्रा) मार्गावरील फेऱ्या देखील कमी कराव्या लागल्या आहेत. कल्याण ते पनवेल या एसआरटीसी बसचे एकेरी भाडे 65 रुपये आहे, तर डोंबिवली ते पनवेल 61 रुपये आहे.