Sunday, August 17, 2025 02:23:36 PM

त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणारच - पुरुषोत्तम कडलग

पुरुषोत्तम कडलग विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष यांनी यावर नवीन माहिती दिली आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणारच - पुरुषोत्तम कडलग

त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नियोजित सांस्कृतिक कार्यक्रमावर पुरातत्व विभागाने आक्षेप घेतला होता . या संदर्भात त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र पाठवून विभागाने नियमबाह्य कार्यक्रम रोखण्याचे आदेश दिले होते. 

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसरात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी दिल्ली येथील पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, हा कार्यक्रम विनापरवानगी आयोजित केला जात असल्याने पुरातत्व विभागाने आक्षेप नोंदवला मात्र, यावर आता पुरुषोत्तम कडलग विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष यांनी यावर नवीन माहिती दिली आहे. 

हेही वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा प्राजक्ता माळीचा कार्यक्रम अडचणीत

पुरुषोत्तम कडलग म्हणाले, त्र्यंबकेश्वर मध्ये प्राजक्ता माळीच कार्यक्रम होणारच कारण हा कार्यक्रम शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. काही जणांनी या कार्यक्रमाला विरोध केला असला तरी सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर हा कार्यक्रम मंदिर परिसरातच होण्याची माहिती पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांशी चर्चा करताना दिली. दरम्यान, 2 दिवस महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत असे कडलग म्हणाले. 


सम्बन्धित सामग्री