Wall collapses in Ghatkopar प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
मुंबई: मुंबईत बुधवारी घाटकोपरमधील नारायण नगर येथे दुरुस्तीचे काम सुरू असताना भिंत कोसळून एका 45 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बांधकाम स्थळांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुपारी 12 वाजता दुरुस्तीचे काम सुरू असताना भिंत कोसळली. जावेद अझीझ खान असं या मृत कामगाराचं नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोंदिया हॉल आणि गौसिया मशिदीजवळील एका घरात नूतनीकरण सुरू असताना अचानक भिंत कोसळली आणि खान ढिगाऱ्याखाली अडकला. रहिवाशी आणि अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले, परंतु राजावाडी रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा - नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
10 व्या मजल्यावरून पडून 24 वर्षीय सिव्हिल इंजिनिअरचा मृत्यू
दुसरी एका घटनेत मालाड पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पात 7 जुलै रोजी 24 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर ओंकार संखे यांचा 10 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधनांची अनुपस्थिती होती. ओंकार एका अस्थिर लोखंडी फळीवरून पडल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - एअर इंडियाचा निर्णय: पुणे-सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित
या प्रकरणात मालाड पोलिसांनी श्री जी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्यांचे मालक निमेश देसाई आणि इतर भागीदारांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 106(1) आणि 290 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनांमुळे मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईची मागणी होत आहे.