Saturday, June 14, 2025 04:10:59 AM

असं काय घडलं नेमकं जे 10 महिन्याच्या बाळाला ठेवून आईने आत्महत्या केली?

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षांच्या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली.

असं काय घडलं नेमकं जे 10 महिन्याच्या बाळाला ठेवून आईने आत्महत्या केली

पुणे: सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षांच्या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची सहा पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. या घटनेपाठोपाठ राजेंद्र हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी समोर आली. हगवणे कुटुंबियांकडून हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप हिला देखील मारहाण करण्यात येत होती. 

वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार एनसी (NC) दाखल झाली होती, नेमकं त्यांनी आपल्या तक्रारीत काय म्हटलं होतं ते पाहूयात .....

वैष्णवीच्या वडिलांच्या तक्रारीत काय? 
वैष्णवीला आर्थिक कारणांमुळे मारहाण करण्यात आली. नवरा शशांक, सासरे राजेंद्र हगवणेंकडून मारहाण केली गेली. सासरच्यांकडून वारंवार पैशांसाठी तगादा लावण्यात आला. वैष्णवी-शशांकचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाला वैष्णवीच्या घरातल्यांचाच विरोध होता. शशांककडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला. 2023मध्ये वैष्णवी गरोदर असताना हा संशय घेतला. मूल माझं नाही असा गंभीर आरोप नवरा शशांकने वैष्णवीवर केला. सासरच्या लोकांकडून सतत छळ करण्यात आला. त्यानंतर वैष्णवीला घरातून हाकलून दिलं. 27 नोव्हेंबर 2023 रोजी छळाला कंटाळून वैष्णवीनं जेवणातून विषारी औषध घेतलं. वैष्णवीच्या नवऱ्याकडून जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी करण्यात आली होती. ती पूर्ण न केल्याने वैष्णवीचा मानसिक आणि शारिरीक छळ करण्यात आला. 

हेही वाचा :वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाची राजकीय नेत्यांकडून दखल; 'अशा नालायक आणि विकृत लोकांना शिक्षा झालीच पाहिजे

हगवणे कुटुंबीयांनी कस्पटे कुटुंबाकडे काय मागणी केली होती? 

वैष्णवीच्या माहेरच्यांकडून लग्नात 51 तोळे सोनं
हगवणे कुटुंबाला हुंड्यात फॉर्चुनर गाडी
7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी
अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी
वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट
माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50 हजार ते 1 लाख रूपये
जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी पूर्ण न केल्याने छळ

वैष्णवी हगवणेची आत्महत्या ही एक हुंडाबळीची केस आहे. यासंदर्भातला हुंडाबंदी कायदा नेमका काय आहे आणि हया कायद्याच्या प्रमुख तरतुदी काय आहेत. 

हेही वाचा : Vaishnavi Hagwane case : वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द
हुंडाबंदी कायद्याच्या प्रमुख तरतुदी 

1961मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. हुंडा म्हणजे लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष वस्तू देणे वा कबूल करणे. स्थावर,जंगम मालमत्ता देणे, अगर देण्याचं कबूल करणे. पैसे,दागिने,करार,जमीन, सोनं कुठल्याही स्वरूपात देवाण-घेवाण केली जाते. हुंडाबंदीबाबत साधारण 10 कलमं आहेत. 498अ अंतर्गत हुंड्यासंबंधी सर्व प्रकरणांवर या कायद्यानुसार कारवाई केली जाते. कमीत कमी 5 वर्षं तुरुंगवास होतो. तर कमीत कमी 15 हजार रुपयांचा दंड होतो किंवा हुंड्याच्या मूल्याइतकी रक्कम घेतली जाते. यांपैकी जी रक्कम जास्त असेल इतक्या रकमेच्या दंडाची शिक्षा दिली जाते. 

अशी एकच वैष्णवी नाही तर असंख्य आहेत ज्यांना या अग्निदिव्यातून जावं लागलंय. एकीकडे प्रगत तंत्रज्ञान, 21वं शतक वैगरे बढाया मारताना आपलं या गंभीर गुन्ह्यांकडे मात्र दुर्लक्ष होतंय. 2024-25 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल जर आपण लक्षात घेतलं तर एक भयाण वास्तव आपल्याला चक्रावून टाकतं. 


सम्बन्धित सामग्री