पिंपरी - चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये बस जळल्याची घटना घडली. मात्र पिंपरी - चिंचवडमधील घटना हा अपघात नव्हे घातपात आहे. बसचालकानेच व्योम ग्राफिक्स कंपनीची बस जाळण्याचा प्रयत्न केला. बसचालकानेच बसला ज्वलनशील पदार्थ लावला. काही कर्मचारी अपमानास्पद वागणूक देत असल्याचा राग असल्याने बसचालकाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. व्योम ग्राफिक्स कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत व्योम ग्राफिक्स कंपनीतील 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
बसचालकाने याच कंपनीमधून केमिकल घेतल्याचं उघड झालं आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. चालकाने बसला केमिकल लावल्याचं उघड झालं आहे. आगीनंतर बसची वाईट अवस्था झाली आहे. या दुर्घटनेत कुणाचा भाऊ गेला तर कुणाचा अन्य नातेवाईक गेला. घरातून डबे घेऊन बाहेर पडलेले कर्मचारी घरी परतलेच नाहीत.
हेही वाचा : लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळण्याबाबत स्पष्टच बोलले उपमुख्यमंत्री शिंदे
ज्या रागातून चालकाने बस पेटवण्याचा प्रयत्न केला तो त्याच्याही अंगलटी आले. बसचालक जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता पोलिसांच्या तपासातून अजून नेमकं काय सत्य समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.