Chhatrapati Sambhaji Maharaj
Edited Image
Wikipedia Controversy: छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी संपादकावर कारवाई केली आहे. वारंवार विनंती करूनही आक्षेपार्ह मजकूर न काढल्याबद्दल किमान चार विकिपीडिया संपादकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॅलिफोर्नियास्थित विकिमीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवण्यात आली आहे. या सूचनेत, संभाजी महाराजांशी संबंधित आक्षेपार्ह गोष्टी विकिपीडियावरून काढून टाकण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु संस्थेने यानंतर कोणतीही कारवाई केली नाही.
विकिपीडियावर संभाजी महाराजांबाबत शेअर केलेली माहिती चुकीची असून त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज भारतात आदरणीय आहेत. अशा कोणत्याही चुकांमुळे त्यांच्या अनुयायांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा - ST Bus travel concession : प्रताप सरनाईकांचं वक्तव्य; एकनाथ शिंदेंचा पूर्णविराम
विकिपीडियाच्या चार ते पाच संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल -
दरम्यान, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सांगितले की, विकिमीडियाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली विकिपीडियाच्या चार ते पाच संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. अधिकाऱ्यांनी विकिपीडियावरून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यासाठी 10-12 ईमेल पाठवले, परंतु विकिपीडियाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा - दिल्लीतील 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भव्यदिव्य प्रारंभ
नोटीस पाठवूनही संपादकांनी हटवला नाही आक्षेपार्ह मजकूर -
तथापी, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पाठवलेल्या ईमेलवर विकिपीडियाकडून फक्त स्वयंचलित प्रतिसाद मिळाला. परंतु, विकिपीडियावरील मजकूर काढून टाकण्यात आला नाही. परिणामी आयटी कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल विकिपीडिया संपादकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सायबर विभागाला विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या चुकीच्या आणि आक्षेपार्ह गोष्टी काढून टाकण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.