Monday, July 14, 2025 05:47:55 AM

नाशिक रामपथ आणि सिंधुदुर्ग पर्यटनासाठी 99 कोटींचा निधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामपथ विकास प्रकल्पाला मंजुरी देत त्यासाठी 99 कोटी रुपयांचे निधी मंजूर केले आहेत.

नाशिक रामपथ आणि सिंधुदुर्ग पर्यटनासाठी 99 कोटींचा निधी

मुंबई : नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामपथ विकास प्रकल्पाला मंजुरी देत त्यासाठी 99 कोटी रुपयांचे निधी मंजूर केले आहेत. नाशिकच्या रामपथाच्या विकासासाठी केंद्र सरकारने ही विशेष मदत दिली असून, यामुळे शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरला मोठी चालना मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाची माहिती ट्विटद्वारे दिली आणि नाशिककरांसाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरेल असे सांगितले.


याच सोबत पंतप्रधान मोदींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात प्रगतीसाठी निधी मंजूर केला आहे. सिंधुदुर्गमध्ये पाणबुडी संग्रहालय उभारणीसाठी केंद्र सरकारने 46 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल.

नाशिक आणि सिंधुदुर्गच्या विकासासाठी घेतलेले हे निर्णय राज्यातील पर्यटन आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील. यामुळे या भागांतील सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला गती मिळेल.


सम्बन्धित सामग्री