Tuesday, January 21, 2025 04:19:26 AM

CCTV off in Navi Mumbai
नवी मुंबईत सीसीटीव्ही बंद ; दुर्लक्षामुळे गुन्हेगारीत वाढ

नवी मुंबईतील सीसीटीव्ही कॅमेरे महिन्याभरापासून बंद पडले आहेत.

नवी मुंबईत सीसीटीव्ही बंद  दुर्लक्षामुळे गुन्हेगारीत वाढ

नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर विभागात नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे लाखो रुपये खर्च करुन लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे महिन्याभरापासून बंद पडले आहेत. सीसीटीव्ही बंद असल्याने बेलापूर विभागात मोबाईल चोरी आणि सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढले असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. बेलापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर देखील मोबाईल चोरीच्या घटना घडत असून सिसीटीव्ही बंद असल्याने नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. मनपा आणि पोलीस प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्वरित हे सिसीटीव्ही कार्यान्वित करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

 

महिनाभर सीसीटीव्ही बंद

नवी मुंबई महापालिकेकडून बेलापूर विभागात सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. ते सीसीटीव्ही कॅमेरे महिनाभरापासून बंद पडले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांना सुरक्षित वाटत नाही. मनपा आणि पोलीस प्रशासन चोरीच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तेथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी तेथील नागरिक करत आहेत.


सम्बन्धित सामग्री