कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनाकडून होत आहे. सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे. सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांना आंदोलनापूर्वी प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
शक्तिपीठ महामार्ग विरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी ही नोटीस बजावण्यात आली आहे. शक्तिपीठ महामार्ग सरकारनं रद्द करावा अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे. तसेच शक्तिपीठ महामार्गाची गरज नाही असेही त्यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. महामार्गाला जमीन देणार नसल्याची तीव्र भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: पुन्हा अशा गोष्टी करू नका; महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदन करत राज ठाकरेंचा सरकारला इशारा
'गोरगरिबांच्या जमिनी घेऊन देवाला जाऊ नये'
शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनामध्ये एका आजीने जीआर दाखवत जमीन देणार नाही अशी तीव्र भूमिका मांडली आहे. सरकारच्या लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी जीआर दाखवून जमीन घेणार नाही असं आश्वासन दिलं होतं. सरकार हे आश्वासन पाळत नाही याचा रोष आजीने व्यक्त केला आहे. जर कुणाला देवाला जायचं असेल तर त्यांनी विमानाने जावं. गोरगरिबांच्या जमिनी घेऊन जाऊ नये अशी प्रतिक्रिया आजीने दिली आहे.
सांगली- कोल्हापूर रोडवर शेतकऱ्यांचा रस्ता रोको
शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहे. सांगली- कोल्हापूर रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात रस्ता रोको होणार आहे. या रस्ता रोकोमध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.