बीड: शुक्रवारी संध्याकाळी बीड जिल्ह्यातील परळी येथे समाधान मुंडे आणि त्याच्या दहा ते पंधरा जणांच्या टोळीने शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही, तर या टोळ्यांनी शिवराज दिवटेचे अपहरण केले. त्यानंतर शिवराजला डोंगराळ भागात नेले. शिवराजला बांबू आणि लाकडी दांडक्यांच्या साहाय्याने अमानुष मारहाण केली. सुदैवाने, या घटनेवेळी लोक शिवराजच्या भेटीला धावून आल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यानंतर, क्षणाचाही विलंब न करता लोकांनी पीडित शिवराजला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर, पीडित शिवराजला भेटण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयात येऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. रविवारी, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी पीडित शिवराज दिवटेची भेट घेत त्याच्या प्रकृतीची चौकशी केली.
हेही वाचा: मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट; रुग्णालयात शिवराजला भेटून दिला धीर
काय म्हणाले माजी मंत्री धनंजय मुंडे?
'संदिपान दिवटे आणि सुरेश दिवटे हे आमच्या कुटुंबीयांतील सदस्यांप्रमाणेच आहेत. हे भांडण नेमकं कोणत्या कारणामुळे झाले? कोणी त्याला मारलं? याचा तपास पोलीसांनी केला आहे,' अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली.
'पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जातीवरून हाणामारी झाली नव्हती. आता त्याचं नेमकं कारण काय? याबद्दल पोलीस अधिकारी तुम्हाला सांगतील,' असे धनंजय मुंडे म्हणाले.
हेही वाचा: कारखाना चालवण्याची धमक असलेल्यांनाच मतदान करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मतदारांना आवाहन
नेमकं प्रकरण काय?
शुक्रवारी संध्याकाळी, बीड जिल्ह्यातील परळी येथे समाधान मुंडे आणि त्याच्या दहा ते पंधरा जणांच्या टोळीने शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही, तर या टोळ्यांनी शिवराज दिवटेचे अपहरण केले. त्यानंतर शिवराजला डोंगराळ भागात नेले. शिवराजला बांबू, कत्ती आणि लाकडी दांडक्यांच्या साहाय्याने अमानुष मारहाण केली. सुदैवाने, या घटनेवेळी लोक शिवराजच्या भेटीला धावून आल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यानंतर, क्षणाचाही विलंब न करता लोकांनी पीडित शिवराजला रुग्णालयात दाखल केले. मात्र, या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकारानंतर, शनिवारी पीडित शिवराज दिवटेने प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्याने माहिती दिली की, 'आपल्याला लोखंडी रॉड आणि कत्नीने बेदम मारहाण केली आहे'. तसेच, शिवराज म्हणाला की, 'या टोळीतील काहीजण म्हणाले होते की, याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा'.
काय म्हणाले पीडित शिवराज दिवटे?
'मी जलालपूर येथे आठवड्याच्या जेवणासाठी गेलो होतो. माझं जेवण झाल्यानंतर काहीजण तिथे आले आणि भांडण करू लागले. मग मी ते भांडण पाहण्यासाठी तिथे उभा राहिलो. मी माझ्या मित्राला शिवाजीनगरमध्ये सोडून रिलायन्स पेट्रोल पंपाकडे जात आहे, ही गोष्ट मारेकऱ्यांना माहित होती. त्यानंतर, पेट्रोल पंपाजवळ येताच पाच गाड्यांमधील मुलांनी माझा रस्ता अडवला. त्यानंतर मला मारहाण करण्यास सुरूवात केली आणि मला रत्नेश्वर टेकडीवर घेऊन गेले. मला मारहाण करत असताना ते म्हणाले की, ''याला सोडायचे नाही, याचा संतोष देशमुख पार्ट-2 करायचा''. हे मला जीवे मारणार होते. त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. जर दोन माणसांनी माझ्यावर हल्ला होत आहे हे बघितलं नसतं, तर कदाचित आज मी जिवंत नसतो. आरोपींनी मला लोखंडाच्या रॉडने, कत्ती आणि लाकडाने मारहाण केली होती. इतकंच नाही, तर माझ्या डोक्यात त्यांनी बाटलीने देखील मारले होते, पण ती बाटली फुटली नाही. यादरम्यान, सर्व आरोपींनी गांजा पिले होते', असे शिवराज दिवटे यांनी घडलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.