Wednesday, July 02, 2025 03:57:17 AM

20 ते 30 टक्के मायलेज देईल तुमची जुनी कार! या ट्रिक्स येतील कामी

कार जुनी होईल तशी किंवा जुनी कार विकत घेतली असेल तर, त्यामध्ये मायलेजसंबंधी समस्या जाणवू शकते. अशा स्थितीत काय करावे, ज्याने गाडीचे मायलेज आणि इंजिनचे आयुष्यही वाढेल? चला, जाणून घेऊ..

20 ते 30 टक्के मायलेज देईल तुमची जुनी कार या ट्रिक्स येतील कामी

Car Mileage Boost: कार जुनी होईल तशी अनेकदा तिचा परफॉर्मन्स पूर्वीसारखा राहत नाही. किंवा जुनी खार करेदी केल्यानंतरही ही बाब जाणवते. अशा स्थितीत तुम्ही जर काही 'स्मार्ट' पद्धती वापरून पाहिल्या तर, गाडीचे मायलेज वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच, गाडीच्या इंजिनचे आयुष्यही वाढू शकते.

एअर कंडिशनरचा वापर मर्यादित करा : गाडीच्या एसीचा जास्त वापर केल्याने मायलेजवर नकारात्मक परिणाम होतो. गरज नसताना एसी वापरणे टाळा किंवा त्याचा वापर कमी करा.

टायरचे प्रेशर कमी करा : टायर प्रेशर बरोबर नसेल तर, गाडीचे मायलेज कमी होऊ शकते. कमी फुगलेल्या टायर्समुळे जास्त घर्षण होते. ज्यामुळे इंधन जास्त खर्च होते. टायर प्रेशर नेहमी योग्य पातळीवर ठेवा.

हेही वाचा - प्रत्येक कारमध्ये असली पाहिजेत 'ही' 5 स्मार्ट गॅझेट्स; उपयोग होईलच, शिवाय, गाडीचं आयुष्यही वाढेल

गीअर्स बदलण्याची योग्य वेळ : जेव्हा रिव्हर्स 2000-2500 RPMच्या आसपास असतील तेव्हा गीअर्स बदला. यामुळे इंजिनची कार्यक्षमता वाढते आणि इंधनाचा वापर कमी होतो.
अचानक एक्सीलेरेशन किंव गती वाढवणे टाळा : अचानक एक्सीलेरेशन वाढल्याने किंवा ब्रेक लावल्याने गाडीचे मायलेज कमी होते. जर तुम्ही फार वेगात नाही किंवा फार हळू नाही, अशा वेगात गाडी चालवली तर इंजिनवर कमी ताण पडेल; ज्यामुळे इंधनाचा वापर देखील कमी होईल.

जास्त वेग टाळा : गाडी जास्त वेगाने चावल्यास ती जास्त इंधन वापरते. 60-80 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवणे हे साधारणपणे सर्वात जास्त इंधन कार्यक्षम असते. वेगमर्यादेपेक्षा जास्त वेग घेतल्याने तुमच्या गाडीचे मायलेज कमी होऊ शकते आणि गाडीच्या इंजिनवरही अधिक ताण येतो. तर, हे सर्व उपाय केल्यास गाडीचे मायलेज 20-30 टक्क्यांनी वाढू शकते.

हेही वाचा - स्पीडमध्ये असलेली Bike थांबवण्यासाठी एकत्र गिअर डाउन करत असाल तर होईल मोठं नुकसान!


सम्बन्धित सामग्री