नवी दिल्ली: सध्या लोक ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून विविध वस्तू खरेदी करत आहेत. आता किराणा सामानापासून टीव्ही फ्रिजसारख्या मोठ्या वस्तू देखील ऑनलाइन मिळत आहेत. तथापी, आता जवळजवळ प्रत्येक ई-कॉमर्स कंपनी आपल्या ग्राहकांना 10 मिनिटांत डिलिव्हरी देत आहे, ज्यामध्ये ऑर्डर दिल्यानंतर 10 मिनिटांतच वस्तू लोकांच्या घरी पोहोचवल्या जातात. त्यामुळे आता ऑनलाइन वस्तू ऑर्डर करणे ही लोकांची सवय बनत चालली आहे.
अमेझॉनवरून वस्तू खरेदी करणे महागणार -
दरम्यान, आता अनेक ई-कॉमर्स कंपन्या त्यांच्या बिलांमध्ये अनेक प्रकारचे शुल्क जोडत आहेत. हे शुल्क इतके जास्त आहे की ग्राहकांना आता प्रत्येक ऑर्डरवर 30 ते 50 रुपये अतिरिक्त द्यावे लागतात. आता ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपल्या वापरकर्त्यांवर एक नवीन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत, आता लोकांना अमेझॉनवरून वस्तू खरेदी करणे महाग होऊ शकते.
हेही वाचा - डेटा वापराच्या बाबतीत भारत आघाडीवर! प्रत्येक स्मार्टफोन दररोज वापरतोय ''इतका'' GB डेटा
आता ग्राहकांकडून आकारण्यात येणार 'हे' शुल्क -
ग्राहकांना त्यांच्या प्रत्येक ऑर्डरवर अनेक प्रकारचे शुल्क द्यावे लागते. यामध्ये हँडलिंग चार्जचा समावेश आहे, जे प्रत्येक ऑर्डरवर निश्चित केला जाते. हे शुल्क सुमारे 10 ते 21 रुपयांपर्यंत असते. याशिवाय, जीएसटी, स्मॉल कार्ट फी, रेन फी, प्लॅटफॉर्म फी हँडलिंग चार्ज, डिलिव्हरी चार्ज असे अनेक शुल्क त्यात समाविष्ट आहेत.
हेही वाचा - आता Amazon घरपोच देणार ''ही'' सेवा! वृद्धांना मोठा होणार फायदा
अमेझॉन ग्राहकांकडून आकारणार मार्केटप्लेस फी -
ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन आता ऑर्डरवर ग्राहकांकडून मार्केटप्लेस फी आकारत आहे, जी प्रत्येक ऑर्डरवर 5 रुपयांपर्यंत आहे. अमेझॉनच्या मते, मार्केटप्लेस फी ही एक फ्लॅट फी आहे, ज्यामुळे अमेझॉन लाखो विक्रेत्यांपासून ते ग्राहकांना मोठ्या प्रमाणात उत्पादनांपर्यंत सोयीस्कर प्रवेश प्रदान करू शकते.