Starlink Satellite Internet
Edited Image
Starlink Satellite Internet Price In India: एलोन मस्कची स्टारलिंक लवकरच भारतात सुरू होणार आहे. एअरटेल आणि रिलायन्स जिओने सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवा प्रदात्या स्टारलिंकसोबत करार केला आहे. एअरटेलने 11 मार्च रोजी आणि जिओने 12 मार्च रोजी स्टारलिंकशी करार केला आहे. आता स्पेसएक्सला भारतीय अधिकाऱ्यांकडून परवाना घ्यावा लागेल. जर सर्व मंजुरी मिळाल्या तर स्पेसएक्सची सेवा देशात सुरू होईल. त्यामुळे आता प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल की, स्टारलिंकचे इंटरनेट भारत कसे काम करेल? स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट किंमत काय असेल? तसेच स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटचा स्पीड किती असेल? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या लेखातून जाणून घेऊयात...
स्टारलिंक इंटरनेट कसे काम करते?
स्टारलिंक ही एक उपग्रह आधारित इंटरनेट सेवा तंत्रज्ञान आहे, जी वायर आणि टॉवरशिवाय इंटरनेट प्रदान करते. यामध्ये, इंटरनेट पोहोचवण्यासाठी उपग्रह आधारित रेडिओ सिग्नलची मदत घेतली जाते. जमिनीवरील हे ग्राउंड स्टेशन उपग्रहाच्या कक्षेत ब्रॉडबँड सिग्नल प्रसारित करते. स्टारलिंग सेवेचा विलंब दर सर्वात कमी आहे. म्हणजे उपग्रहातून सिग्नल कोणत्याही विलंबाशिवाय जमिनीवर पाठवला जातो.
हेही वाचा - Starlink Satellite Internet: Airtel नंतर Jio ने जोडलं स्टारलिंकसोबत 'कनेक्शन'; आता दुर्गम भागातही इंटरनेट चालणार
भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटची किंमत किती असेल?
सध्या, अमेरिकेत स्टारलिंकसाठी, वापरकर्त्यांना सेटअप आणि मासिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. अमेरिकेत बुकिंग केल्यानंतर, हार्डवेअरचे शुल्क 499 डॉलर (सुमारे 43 हजार रुपये) आकारले जाते. तसेच स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटसाठी मासिक शुल्क 110 डॉलर (सुमारे 9 हजार रुपये) आहे. अमेरिकेप्रमाणेच भारताचीही स्टारलिंकसाठी अशीच योजना असू शकते. तथापि, अद्याप कंपनीने भारतातील प्लॅन आणि हार्डवेअरची किंमत जाहीर केलेली नाही. काही अहवालांनुसार, भारतात त्याची किंमत 7 हजार रुपयांपर्यंत असू शकते. याशिवाय, ग्राहकांना इन्स्टॉलेशन शुल्क वेगळे द्यावे लागू शकते. स्टारलिंक व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी वेगवेगळ्या योजना देते.
हेही वाचा - X Down: जगभरात 'एक्स' सर्व्हर डाउन, अर्ध्या तासाहून अधिक काळ वापरकर्त्यांना करावा लागला अडचणींचा सामना
सॅटेलाइट इंटरनेटचा स्पीड किती आहे?
उपग्रह इंटरनेटचा वेग अनेक घटकांवर अवलंबून असतो, जसे की उपग्रह तंत्रज्ञान, नेटवर्क गर्दी आणि वापरकर्त्याचे स्थान. साधारणपणे, जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स (GEO) कडून मिळणारा इंटरनेट स्पीड 25 Mbps ते 100 Mbps पर्यंत असू शकतो, परंतु त्यात लेटन्सी (पिंग) जास्त असते, जी 500ms ते 700ms पर्यंत असू शकते.