Friday, July 11, 2025 11:37:59 PM

चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाची हकालपट्टी

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव गोविंदराज यांना बडतर्फ करण्यात आले आहे. चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवाची हकालपट्टी
CM Siddaramaiah Government Secretary Govindaraj
Edited Image

बेंगळुरू: कर्नाटकमधून मोठी बातमी समोर येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव गोविंदराज यांना बडतर्फ करण्यात आले आहे. चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी या प्रकरणात पोलिस आरसीबी मार्केटिंग प्रमुखासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, 4 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ची चिन्नास्वामी स्टेडियमवर विजय परेड झाली होती. या दरम्यान 3 लाख लोकांचा जमाव स्टेडियममध्ये पोहोचला होता. त्यानंतर चेंगराचेंगरीमुळे सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. तर 55 जण जखमी झाले. या प्रकरणात आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराज यांना बडतर्फ करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत कर्नाटक सरकारच्या अनेक अधिकाऱ्यांवर आणि पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह 4 जणांना अटक

प्राप्त माहितीनुसार, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 35 हजार लोक बसण्याची क्षमता आहे. पंरतु, विजयी परेडच्या दिवशी 3 लाखांहून अधिक लोक स्टेडियममध्ये पोहोचले होते. त्यानंतर गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाली. या संपूर्ण घटनेनंतर भाजपमधील अनेक नेत्यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. 

हेही वाचा - बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारच्या अडचणी वाढल्या; उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

सोशल मीडियावर लोक या घटनेसाठी सिद्धरामय्या सरकारला जबाबदार धरत आहेत. याशिवाय कर्नाटकातील विरोधी पक्ष कर्नाटक सरकारवर सतत निशाणा साधत आहेत. तथापि, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल यांना अटक केली आहे. आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख मुंबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, असंही पोलिसांनी सांगितलं. 
 


सम्बन्धित सामग्री